शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
2
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
3
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
4
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
5
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
6
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
7
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
8
दुधाचे दात पडण्याआधी कॉम्प्युटर शिकले, शाळेत शिकताना बनले सर्वात तरुण सीईओ...
9
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
10
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
11
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
12
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
13
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
14
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
15
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
16
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
17
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
18
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
19
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!
20
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!

चांदण्यात फिरताना... थोडंसं दुपारीही फिरू या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 1:24 PM

वातावरणात बदल जाणवू लागला. उन्हाळ्याची चाहूल लागली

वातावरणात बदल जाणवू लागला. उन्हाळ्याची चाहूल लागली. सतत गाडी, रिक्षांचा वापर व तोंड बांधून बाहेर पडणं. यामुळे आपण आजूबाजूला पाहत नाही. हाशऽहुशऽ ला सुरुवात झाली की चर्चा चालू असते. खरंतर सकाळी व संध्याकाळी वातावरण मस्त आल्हाददायक असते, असे समजले जाते. तीच वेळ फिरायची, भेटायची, मिटिंगची ठरवली जाते. जरी कुठे जायचे तर वाहनांचाच वापर केला जातो. सुनसान रस्ते असणारी ही दहानंतरची दुपार असते.आता तुम्ही म्हणाल हो, हे काय नवीन आहे का? खरंच काही तरी सांगत आहेत. नवीन काहीच नाही, पण दृष्टी बदलली की सगळं नवीनच! अनोखं , निसर्ग सौंदर्य!! निसर्गाची रंगपंचमी.. पाहूया दुपारची..ठरलेल्या ऋतुचक्राप्रमाणे हिवाळा संपला (थंडीची चाहूलही न देता, वातावरण बदल) तरीही पानगळ सुरू झाली. सोडून आर्तमन पिवळी पर्णे गळून नवजीवन देत तरुस जगणं शिकवत आहेत.कितीदा नव्याने? म्हणत...नवजीवन,नवतारुण्य, नवचैतन्य घेत-देत ही सजीवसृष्टी, हा सभोवतालचा आसमंत बहरत हरित रंगीत होत आहे.

रंग बदलती दुनिया में ?...बदलते रंगाचे अंकुरणे,पानांचे ते रंग बदलणे, पानापानांत दडलेली बालकळी , कुठे लाजत पाकळी उमलणारी फुले, विविधरंगी विविधता दाखवणारी अनेक झाडे, फुले चालत जाताना ही बहार आपणास दिसते. रस्त्यावर ,रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागेत, मोकळ्या रानात आपलं खुललेलं रुप खुदकन हसून दाखवत आहेत.सर्व जीवाला वेड लावते ते वेडभ्रमऱ फुलपाखरू यांना मोहीम करून स्पर्शण्यास आकर्षित करत आहेत?.

वाटेवरचा चालता चालता हा अनुभव घेत असताना मजेत इकडे तिकडे बघत असताना खट्याळ वारा गोलाकार घोंगावत फिरत वाटेवरचा धूळफेकीचा लाडिक चाळा करत सरसर पुढे जात उडता ओढणीचा पदर धरत कपाळावर आलेली बट मागे सारत डोळे मिटून पुन्हा चोळत उघडत इकडे तिकडे पाहत मन हरवून हा निसर्ग सोहळा आसमंताला पाहत पाऊल चालत राहतो.

सहभागी कुंड्यातील झाडे, बागेतील, गच्चीवरील झाडे कुंपणाच्या वर मान काढून डोकावून आपलं सौंदर्य दाखवण्याचा अवखळ प्रयत्न करीत आहेत.त्यांचे डोकावून पाहणे वाटसरु जाणून घेत हलकेच हात लावून काढत आहेत.,व्वा.. किती सुंदर कौतुक करून जात आहेत. निसर्गप्रेमी एखाद्या धाडसाने मला ह्याचे बी, रोपं देता का विचारत आहेत, विनवणी करत आहेत.

रंगांची उधळण, एक ना अनेक फुलांची सजावट एक ना अनेक रंग.. लाल, पिवळा, गुलाबी, केशरी, निळा जांभळा, फिक्कट गुलाबी, फिक्कट निळा विविध रंगांच्या छटा मनमोहित करण्यासाठी सज्ज झाल्या. पळस, बोगनवेल, गौरीशौरी, पिवळा बेल, एक्झोरा, कन्हेरी, गुलबक्ष, कोरंटी, चांदनी, स्वस्तिक, गुलाब, चिनीगुलाब, आॅफिसटाईम, जास्वंद, अबोली, अडेनियमची नवलाई, मधूमालती, कुंदा, चमेली, कुठेतरी जाई, झेंडू पिवळा केशरी, प्रत्येक ठिकाणी रानीवनी रानफुले रानवेली, गारवेली, धोतरा अशी अनंत फुलांची रंगावली त्यात कॅक्टसची ही सुंदरता भर घाली?. अशी ही निसर्ग जैवविविधतेची मांदियाळी मनतन सुगंधित करी?.

 कोकिळाची मध्येच गाणी, सोहळ्याला उपस्थित असणारे विहंग, पाखरे, फुलपाखरे भिरभिरती. असे विहंगम दृश्य अनुभवायला येते जेव्हा करता पैदल सफारी. तसेच अशा सकाळी दहानंतरच्या उन्हात डी जीवनसत्वाची कमतरताही भरुन निघेल.असा हा दुपारी चालण्याचा आनंद घेत एक रोप लावूया अंगणी कसा विचार येईल मनी.आरोग्यही लाभेल जिवनी. हे सगळं पाहत निवांत चालताना मनात विचार आणून या उन्हाळ्यात झाडाला पाणी घालूया. एक तरी झाड वाचवू या.

पशुपक्ष्यांना पाणी ठेवूया. निसर्ग संवर्धनला हातभार लावूया. चला तर मग आठवड्यातून दुपारी एक फेरफटका मारुया. सभोवताली निरखून पाहू या.- विद्या भोसले(लेखिका निसर्ग माझा चळवळीच्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरTemperatureतापमान