शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Rain: कुर्डूवाडी बस डेपोत कमरेपर्यंत पाणी; अडकलेल्या दहा प्रवाशांना सुखरूप काढले बाहेर

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: October 7, 2022 15:14 IST

Rain: कुर्डूवाडी बस डेपोत कमरेपर्यंत पावसाचे पाणी साचल्यामुळे डेपोत अडकलेल्या दहा प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. एसटी विभागाचे वरिष्ठ अधिकारी डेपोत तात्काळ दाखल होऊन अडकलेल्या प्रवाशी तसेच तेथील कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढले.

- बाळकृष्ण दोड्डी सोलापूर : कुर्डूवाडी बस डेपोत कमरेपर्यंत पावसाचे पाणी साचल्यामुळे डेपोत अडकलेल्या दहा प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. एसटी विभागाचे वरिष्ठ अधिकारी डेपोत तात्काळ दाखल होऊन अडकलेल्या प्रवाशी तसेच तेथील कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी पावसाच्या पाण्याला वाट करून दिली. साचलेल्या पाण्याची पातळी आता कमी होवू लागली असून डेपो पूर्वपदावर येत असल्याची माहिती सोलापूर आगाराचे विभाग नियंत्रक विलास राठोड यांनी दिली आहे.

गुरुवारी रात्री सोलापूर शहर व ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. कुर्डूवाडी जवळील केम परिसरात ढगफुटी झाल्याची माहिती आहे. या परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे करमाळ्याहून कुर्डूवाडीकडे येणारा नाला ओव्हरफ्लो झाला. या नाल्याचे पाणी डेपोमध्ये शिरल्यामुळे कुर्डूवाडी डेपो परिसरात कमरेपर्यंत पाणी साचले. या डेपोत काही प्रवासी रात्री थांबून होते. सकाळी संपूर्ण डेपो परिसरात कमरेपर्यंत पाणी साचल्यामुळे प्रवाशांना सुखरूप बाहेर पडता आले नाही. तसेच या ठिकाणी एसटी विभागाचे दहा ते बारा कर्मचारी अडकून पडले. सकाळी सात दरम्यान विभाग नियंत्रक विलास राठोड हे त्यांच्या पथकासह कुर्डूवाडी डेपोत दाखल झाले. पाण्याला वाट करून देण्यासाठी त्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या परिश्रमानंतर अवघ्या काही तासात पाण्याची पातळी कमी झाली. त्यानंतर तेथून प्रवासी तसेच कर्मचाऱ्यांना डेपोतून बाहेर काढले.

टॅग्स :RainपाऊसSolapurसोलापूर