सोलापुरात लग्नासाठी आलेल्या मुलाचा कंबर तलावात बूडून मृत्यू

By Admin | Updated: April 30, 2016 18:10 IST2016-04-30T18:10:00+5:302016-04-30T18:10:00+5:30

लष्कर भागात नातेवाईकाच्या घरी लग्नासाठी आलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे

The waist of the boy who got married in Solapur leaves him dead in the lake | सोलापुरात लग्नासाठी आलेल्या मुलाचा कंबर तलावात बूडून मृत्यू

सोलापुरात लग्नासाठी आलेल्या मुलाचा कंबर तलावात बूडून मृत्यू

>ऑनलाइन लोकमत - 
सोलापूर, दि. 30 - लष्कर भागात नातेवाईकाच्या घरी लग्नासाठी आलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. मुलाचं वय अंदाजे 12 ते 15 वर्ष आहे.  पिडीत मुलगा आपल्या तीन साथीदारांना सोबत घेऊन विजापूर रोडवरील कंबर तलाव येथे पोहण्यासाठी गेला असताना तलावात बुडून मृत्यू झाला. आज शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास ही घटना घ़डली. मुलाचा मृतदेह अद्याप सापडलेला नसूल पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान मृतदेहाचा शोध घेत आहेत. 

Web Title: The waist of the boy who got married in Solapur leaves him dead in the lake