वाघोलीकरांनी करून दाखवलं, गावची १०० टक्के लसीकरणाकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:26 IST2021-09-22T04:26:01+5:302021-09-22T04:26:01+5:30
वाघोली (ता. माळशिरस) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामार्फत कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनचे लसीकरण १०० टक्के होण्याच्या मार्गावर आहे. वाघोली गावचे व ...

वाघोलीकरांनी करून दाखवलं, गावची १०० टक्के लसीकरणाकडे वाटचाल
वाघोली (ता. माळशिरस) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामार्फत कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनचे लसीकरण १०० टक्के होण्याच्या मार्गावर आहे. वाघोली गावचे व पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते, लवंग प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष खडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपकेंद्र वाघोलीच्या समुदाय अधिकारी रेणुका पाखरे, आरोग्य सेवक कलढोणे, सरतापे, आरोग्य सेविका एस. टी. उकरंडे, आशा सेविका सारिका सरवदे, उज्ज्वला निकम, अरुणा जानराव, कमल कांबळे, गणेश शेंडगे, मल्हारी जाधव, दादा गायकवाड, बलभीम ओहळ, ज्ञानेश्वर मिसाळ, राजेंद्र मिसाळ, सुभाष चव्हाण, जगदीश मिसाळ यांनी विशेष प्रयत्न केले. गावातील वय वर्षे १८ पासून पुढील वयोगटातील ५१५० पैकी ४५५० नागरिकांना कोविडची लस दिली आहे. लवकरच वाघोली गावचे लसीकरण १०० टक्के करण्याचा मानस आरोग्य कर्मचारी यांनी केला.