वाघोलीत टेनिसबॉल स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:19 IST2020-12-23T04:19:16+5:302020-12-23T04:19:16+5:30

कुरुल : स्व. धनराज पतंगे प्रतिष्ठानच्या वतीने (वाघोली, ता. मोहोळ) येथे टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेचा ...

Wagholi Tennis Ball Tournament | वाघोलीत टेनिसबॉल स्पर्धा

वाघोलीत टेनिसबॉल स्पर्धा

कुरुल : स्व. धनराज पतंगे प्रतिष्ठानच्या वतीने (वाघोली, ता. मोहोळ) येथे टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण माजी सरपंच रामचंद्र पतंगे यांच्या हस्ते झाले. या क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक के. एन. क्रिकेट क्लब वाघोली, द्वितीय क्रमांक जय सेवालाल क्रिकेट संघ, मंद्रूप, तर तृतीय क्रमांक शिवशक्ती क्रिकेट संघ, कामती या संघांनी विजय मिळवला. यावेळी ज्ञानेश्वर पाटील, सुधीर होणराव, विशाल कोरे, महेश हरणे, पांडुरंग पाटील यांच्या वतीने रोख अकराशे रुपयांचे पारितोषिके देण्यात आली. यावेळी माजी सरपंच गजेंद्र वाघमारे, माजी उपसरपंच शेखर चोरमुले, माजी उपसरपंच भुजंग कोळेकर, युवानेते नागराज पतंगे, विकास वाघमारे, तानाजी शिवशेट्टी, राजू कोरे, सिद्धेश्वर पवार उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नितीन इंगळे, शिवलिंग दसाडे, दीपक दसाडे, जयराम निचरे, हर्षल पाटील, गणेश कोरे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Wagholi Tennis Ball Tournament