शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेसाठी मतदार यादी निश्चित: २२ तृतीपंथींनी नोंदविले नाव

By admin | Updated: January 24, 2017 20:45 IST

महापालिकेसाठी मतदार यादी निश्चित: २२ तृतीपंथींनी नोंदविले नाव

महापालिकेसाठी मतदार यादी निश्चित: २२ तृतीपंथींनी नोंदविले नावसोलापूर : महापालिका निवडणुकीसाठी ६ लाख ७३ हजार ९४२ मतदार निश्चित झाले असून, अंतिम मतदार यादी शनिवारी प्रसिद्ध करण्यात आली. यात ३ लाख ४८ हजार २२३ पुरूष तर ३ लाख २५ हजार ६९७ स्त्री मतदार आहेत. २२ तृतीयपंथी मतदारांनीही नावनोंदणी केली आहे. २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदार याद्यी आज निश्चित करण्यात आली. यापूर्वी या निवडणुकीसाठी विधानसभानिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात नव्याने करण्यात आलेल्या मतदार नोंदणीची प्रभागनिहाय प्रारूप यादी पुरवणीद्वारे १२ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या प्रारूप पुरवणी मतदार यादीवर १७ जानेवारीपर्यंत सूचना व हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यात १९३ जणांनी हरकती नोंदविल्या होत्या. हरकतीचे तीन भाग करण्यात आले होते. लेखनिकाच्या चुकांबाबत १0 तक्रारी आल्या होत्या. त्याप्रमाणे मतदार यादीची तपासणी केल्यावर लेखनिकाची कोणतीच चूक नसल्याने या हरकती फेटाळण्यात आल्या. दुसऱ्या प्रभागात नाव समाविष्ठ झाल्याच्या १५२ तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची संबंधितांच्या घरी जाऊन पत्त्यानुसार खातरजमा करण्यात आली. त्यातील १३२ तक्रारींची दखल घेऊन घरच्या पत्त्याप्रमाणे मतदार यादीत नाव समाविष्ठ करण्यात आले. यातील २0 तक्रारी दप्तरी दाखल करण्यात आल्या. विधानसभा मतदार यादीत नाव असताना नव्या यादीत नाव वगळल्याच्या ४ तक्रारी आल्या होत्या. या तक्रारीची खातरजमा केल्यावर तक्रारदारांनी २0१४ च्या विधानसभा मतदार यादीत नाव होते असे म्हटले होते. पण मनपासाठी २0१६ ची यादी वापरण्यात आल्याने तक्रारीत तथ्य नसल्याने फेटाळून लावण्यात आल्याचे उपमुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत मायकलवार यांनी सांगितले.दुबार, मयतांच्या नावासमोर चिन्हेविधानसभा मूळ मतदार यादीत ६ लाख ४४ हजार ४५१ इतके मतदार होते. नव्याने त्यात सुमारे ३0 हजारांची भर पडली आहे. मूळ यादीतून ३९४ नावे वगळण्यात आली आहेत. दुबार व मयत झालेल्यांची नावे मतदार यादीतून अद्याप वगळलेली नाहीत. मयताबाबत आलेल्या तक्रारीबाबत अभिलेखातील नोंदीची पडताळणी करून मतदार यादीतील त्या नावासमोर विशीष्ठ अशी खूण करण्यात यावी असे निवडणूक आयोगाने कळविले आहे. दुबार नावे एकाखाली एक घेण्यात आली असून, अशा नावासमोर मानवी चेहऱ्याचे चिन्ह दर्शविलेले आहे.८९८ मतदान केंद्रे३१५ इमारतीत ८९८ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यात आत्पतकालीन आणखी १00 मतदान केंद्रे राखीव ठेवण्यात आली आहेत. मतदान केंद्रासाठी ११६ शासकीय इमारतीत २७१ मतदान केंद्रे आहेत तर ११९ शाळा व महाविद्यालयाच्या इमारतीत ६२७ मतदान केंद्रे आहेत. सीमेवर जागेच्या अभावी सहा प्रभागात २२ मतदान केंद्रे प्रभागाबाहेर करण्यात आली आहेत. या बदलाबाबत निवडणूक आयोगाला कळविण्यात आले आहे. त्यात प्रभाग ४ मध्ये एका इमारतीत ५, प्रभाग ८ मध्ये एका इमारतीत ४, प्रभाग १७ मध्ये दोन इमारतीत ८, प्रभाग २0 मध्ये एका इमारतीत ३, प्रभाग २५ मध्ये एका इमारतीत २ अशी मतदार केंद्रे असणार आहेत.