महापालिकेसाठी मतदार यादी निश्चित: २२ तृतीपंथींनी नोंदविले नाव

By Admin | Updated: January 24, 2017 20:45 IST2017-01-24T20:45:18+5:302017-01-24T20:45:18+5:30

महापालिकेसाठी मतदार यादी निश्चित: २२ तृतीपंथींनी नोंदविले नाव

Voters list fixed for NMC: 22 Trittians registered by name | महापालिकेसाठी मतदार यादी निश्चित: २२ तृतीपंथींनी नोंदविले नाव

महापालिकेसाठी मतदार यादी निश्चित: २२ तृतीपंथींनी नोंदविले नाव

महापालिकेसाठी मतदार यादी निश्चित: २२ तृतीपंथींनी नोंदविले नाव

सोलापूर : महापालिका निवडणुकीसाठी ६ लाख ७३ हजार ९४२ मतदार निश्चित झाले असून, अंतिम मतदार यादी शनिवारी प्रसिद्ध करण्यात आली. यात ३ लाख ४८ हजार २२३ पुरूष तर ३ लाख २५ हजार ६९७ स्त्री मतदार आहेत. २२ तृतीयपंथी मतदारांनीही नावनोंदणी केली आहे.
२१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदार याद्यी आज निश्चित करण्यात आली. यापूर्वी या निवडणुकीसाठी विधानसभानिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात नव्याने करण्यात आलेल्या मतदार नोंदणीची प्रभागनिहाय प्रारूप यादी पुरवणीद्वारे १२ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या प्रारूप पुरवणी मतदार यादीवर १७ जानेवारीपर्यंत सूचना व हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यात १९३ जणांनी हरकती नोंदविल्या होत्या. हरकतीचे तीन भाग करण्यात आले होते. लेखनिकाच्या चुकांबाबत १0 तक्रारी आल्या होत्या. त्याप्रमाणे मतदार यादीची तपासणी केल्यावर लेखनिकाची कोणतीच चूक नसल्याने या हरकती फेटाळण्यात आल्या.
दुसऱ्या प्रभागात नाव समाविष्ठ झाल्याच्या १५२ तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची संबंधितांच्या घरी जाऊन पत्त्यानुसार खातरजमा करण्यात आली. त्यातील १३२ तक्रारींची दखल घेऊन घरच्या पत्त्याप्रमाणे मतदार यादीत नाव समाविष्ठ करण्यात आले. यातील २0 तक्रारी दप्तरी दाखल करण्यात आल्या. विधानसभा मतदार यादीत नाव असताना नव्या यादीत नाव वगळल्याच्या ४ तक्रारी आल्या होत्या. या तक्रारीची खातरजमा केल्यावर तक्रारदारांनी २0१४ च्या विधानसभा मतदार यादीत नाव होते असे म्हटले होते. पण मनपासाठी २0१६ ची यादी वापरण्यात आल्याने तक्रारीत तथ्य नसल्याने फेटाळून लावण्यात आल्याचे उपमुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत मायकलवार यांनी सांगितले.

दुबार, मयतांच्या नावासमोर चिन्हे
विधानसभा मूळ मतदार यादीत ६ लाख ४४ हजार ४५१ इतके मतदार होते. नव्याने त्यात सुमारे ३0 हजारांची भर पडली आहे. मूळ यादीतून ३९४ नावे वगळण्यात आली आहेत. दुबार व मयत झालेल्यांची नावे मतदार यादीतून अद्याप वगळलेली नाहीत. मयताबाबत आलेल्या तक्रारीबाबत अभिलेखातील नोंदीची पडताळणी करून मतदार यादीतील त्या नावासमोर विशीष्ठ अशी खूण करण्यात यावी असे निवडणूक आयोगाने कळविले आहे. दुबार नावे एकाखाली एक घेण्यात आली असून, अशा नावासमोर मानवी चेहऱ्याचे चिन्ह दर्शविलेले आहे.

८९८ मतदान केंद्रे
३१५ इमारतीत ८९८ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यात आत्पतकालीन आणखी १00 मतदान केंद्रे राखीव ठेवण्यात आली आहेत. मतदान केंद्रासाठी ११६ शासकीय इमारतीत २७१ मतदान केंद्रे आहेत तर ११९ शाळा व महाविद्यालयाच्या इमारतीत ६२७ मतदान केंद्रे आहेत. सीमेवर जागेच्या अभावी सहा प्रभागात २२ मतदान केंद्रे प्रभागाबाहेर करण्यात आली आहेत. या बदलाबाबत निवडणूक आयोगाला कळविण्यात आले आहे. त्यात प्रभाग ४ मध्ये एका इमारतीत ५, प्रभाग ८ मध्ये एका इमारतीत ४, प्रभाग १७ मध्ये दोन इमारतीत ८, प्रभाग २0 मध्ये एका इमारतीत ३, प्रभाग २५ मध्ये एका इमारतीत २ अशी मतदार केंद्रे असणार आहेत.

Web Title: Voters list fixed for NMC: 22 Trittians registered by name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.