शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शब्दांजली; असा शिस्तबद्ध कलावंत पुन्हा होणे नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 13:53 IST

श्रीराम लागूंच्या जाण्याने सोलापूरकर हळहळले; साहित्यिक तसेच नाट्य कलावंतांनी व्यक्त केल्या भावना

ठळक मुद्देज्येष्ठ नाट्य व सिनेअभिनेते डॉ़ श्रीराम लागू यांचे मंगळवारी रात्री निधन झालेडॉ. लागू हे सोलापूर आणि सोलापूरकरांशी विशेष आपुलकी राखून होते़ ते संयमी होतेसंवेदनशीलही़ त्यांच्यासारखा शिस्तबद्ध अभिनेता पुन्हा होणे शक्य नाही

सोलापूर : ज्येष्ठ नाट्य व सिनेअभिनेते डॉ़ श्रीराम लागू यांचे मंगळवारी रात्री निधन झाले़ त्यांच्या निधनानंतर येथील कलावंत तसेच कलाप्रेमी रसिकांनी शोक व्यक्त केला. डॉ. लागू हे सोलापूर आणि सोलापूरकरांशी विशेष आपुलकी राखून होते़ ते संयमी होते आणि संवेदनशीलही़ त्यांच्यासारखा शिस्तबद्ध अभिनेता पुन्हा होणे शक्य नाही, अशा भावना कलावंतांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या.

नटसम्राट डॉ़ श्रीराम लागू हे जमिनीवरचे कलावंत होते़ ते सर्वसामान्य कलावंतांशीही आपुलकीने बोलायचे़ हुतात्मा स्मृती मंदिरातील गणपत मोरे नामक बॅक स्टेज कलावंतालाही ते खूप आपुलकीने बोलायचे़ त्याच्याशी संवाद साधायचे़ त्याच्या परिवाराची काळजी ते करत़ आणि त्याला डॉ़ लागूंनी आर्थिक मदतही केली़-विजय साळुंकेअध्यक्ष : मराठी नाट्य परिषद, उपनगरीय शाखा, सोलापूर

डॉक्टर साहेबांनी केलेली कामे अजरामर आहेत़ त्यांचा नाटकाबद्दलचा दृष्टिकोन खूपच सकारात्मक होता़ नाटकांची निवड करतानादेखील ते खूप विचार करायचे़ त्यांचे पाठांतर आणि संवादशैलीदेखील अनोखी होती़ ते कलाप्रेमी होते़ कलेवर त्यांचे अपार प्रेम होते़ कलेशी त्यांनी कधी तडजोड केली नाही़ त्यांची नाटकं अनेकांसाठी मार्गदर्शक आहेत़-प्रा़. दीपक देशपांडे, हास्यसम्राट

डॉ. लागू म्हणजे नाट्यसृष्टीतला मोठा दीपस्तंभ होय़ त्यांची अनेक नाटके मी पाहिली आहेत़ ‘सूर्य पाहिलेला माणूस’, ‘मित्र’, ‘नटसम्राट’, ‘बेबंदशाही’, ‘लग्नाची बेडी’ यासह इतर अनेक नाटकं मराठी नाट्यसृष्टीत अजरामर ठरली आहेत़ त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीची हानी झाली आहे़ ते कलावंतप्रेमी होते़ अनेक कलाप्रेमींना त्यांनी मोठे केले़ सर्वांचे ते आधारवड होते़-प्रशांत बडवेकार्याध्यक्ष : मराठी साहित्य परिषद, शाखा दक्षिण सोलापूर

कलावंतांवर अतिशय मनसोक्त प्रेम करणारा कलावंत आज आपल्यात नाही, ही गोष्ट मनाला पटत नाही़ ते माणूस म्हणून ग्रेट होते़ असा अत्यंत संयमी आणि संवेदनशील माणूस सिनेसृष्टीत शोधून सापडणार नाही़ ते अनेकांचे प्रेरणास्थान होते़ सोलापुरात अनेकदा त्यांची भेट झाली़ त्यांची नाटके पाहूनच आम्ही नाट्यप्रेमात पडलो़ त्यांना आणि त्यांच्या कामांना कधीच विसरता येणार नाही़ ते सदैव स्मरणात राहतील.-प्रा़ अजय दासरीअध्यक्ष : मराठी नाट्य परिषद, महानगर शाखा, सोलापूर

डॉ़ श्रीराम लागू यांच्या निधनाची बातमी ऐकून मी नि:शब्द झालो़ ते नाटककार म्हणून खूपच ग्रेट होते़ त्यांनी प्रायोगिक नाटकांना एक वेगळे व्यासपीठ मिळवून दिले़ अनेक वेगळी नाटके रंगमंचावर आणून त्यांनी रंगभूमीला एका उंचीवर आणले़ त्यावेळी अमोल पालेकर आणि डॉ़ लागू यांनी प्रायोगिक रंगभूमीला नवीन ऊर्जा मिळवून दिली़ डॉ़ लागू अत्यंत वेगळे होते़ एक नाटककार म्हणून आणि माणूस म्हणूनही़ आज त्यांच्या जाण्याने नाट्य क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. -आनंद खरबस

कार्यकारिणी सदस्य : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई

टॅग्स :SolapurसोलापूरShriram Lagooश्रीराम लागूmarathiमराठीDeathमृत्यू