शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

विठ्ठल...विठ्ठल... पंढरपुरात नवा विठ्ठल! उत्पातांनंतर बडव्यांचाही पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 06:14 IST

पंढरीचा विठुराया म्हणे युगानुयुगे एकाच ठिकाणी उभारला. वीट सोडून कधी खाली उतरला नाही. जागा सोडून कधी हलला नाही; मात्र कलियुगात नव्या परंपरेची चाहूल लागली.

- सचिन जवळकोटेसोलापूर - पंढरीचा विठुराया म्हणे युगानुयुगे एकाच ठिकाणी उभारला. वीट सोडून कधी खाली उतरला नाही. जागा सोडून कधी हलला नाही; मात्र कलियुगात नव्या परंपरेची चाहूल लागली. उत्पातांनी रुक्मिणी मातेचं स्वतंत्र मंदिर उभारल्यानंतर आता बडव्यांनीही विठ्ठलासाठी पुढाकार घेतला. खऱ्या मंदिराचा ताबा गेल्यामुळं स्वत:च्या जागेत नव्या मूर्तीची स्थापना जाहली.न्यायालयीन लढाईनंतर पंढरपूरच्या बडवे-उत्पात समाजाला विठ्ठल मंदिरावरचा ताबा गमवावा लागला होता. मंदिरात शासनाने पगारी पुजारी नेमले. तेव्हापासून हा समाज अस्वस्थ होता; मात्र गेल्यावर्षी घटस्थापनेला उत्पातांनी वसिष्ठ आश्रम परिसरात रुक्मिणीचे छोटेखानी मंदिर बनविले. त्यावेळी प्रचंड गदारोळ झाला. ‘प्रति रुक्मिणी मंदिर बनविणारे हे उत्पात कोण?’ असा संतप्त सवालही पुरोगामी मंडळींनी विचारला. या पार्श्वभूमीवर काळा मारुतीजवळ बाबासाहेब बडवे यांनी शुक्रवारी विठ्ठलाच्या नव्या मूर्तीची स्थापना केली. पंढरपुरातीलच एका मूर्तीकाराकडून सुमारे साडेतीन फुटाची सुबक मूर्ती बनवून घेण्यात आली. शुक्रवारी मूर्तीला ख-या विठ्ठलासारखाच पेहराव करण्यात आला. गाभारा परिसरात फुलांची आकर्षक सजावटही करण्यात आली.मात्र, मंदिराला ‘प्रति विठ्ठल’ म्हणू नये, असे आवाहन खुद्द बडव्यांनीच केले आहे. ‘गुढीपाडव्यापासून शिमग्याच्या पौर्णिमेपर्यंत परंपरेनुसार घरातील कुलधर्म-कुळाचार करण्यासाठी आम्ही वर्षानुवर्षे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जात होतो; मात्र आता आम्ही नाईलाजानं स्वत:च्या घरातच नव्या विठ्ठल मूर्तीची प्रतिष्ठापना केलीय;’ असं बाबासाहेबांचे पुतणे अ‍ॅड.आशुतोष बडवे यांनी ‘लोकमत’ला सांगितलं.‘हे आमचं खाजगी देवघर आहे. याला कुणीही प्रति विठ्ठल म्हणू नये,‘ असं म्हणणारे बडवे ‘ मात्र इतर भाविक मंडळी या ठिकाणी दर्शनाला आली तर आमची काहीच हरकत असणार नाही’, असेही सांगायला विसरले नाहीत.मंदिरे कैक; मात्र ‘नवा विठ्ठल’ पहिलाचपंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीची कैक छोटी-मोठी मंदिरे आहेत. अनेक बडवे-उत्पातांनी आपल्या घरातही या दोघांसाठी देवघर सजविलेला; मात्र विठ्ठल मंदिराचा ताबा गेल्यानंतर नव्या मूर्तीची स्थापना शुक्रवारी पहिल्यांदाच झाली.

टॅग्स :PandharpurपंढरपूरSolapurसोलापूर