विठ्ठल मंदिर उघडणार : पंढरीत जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:24 IST2021-09-26T04:24:51+5:302021-09-26T04:24:51+5:30
पंढरपूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ७ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातील सर्व मंदिरे उघडणार आहेत. ...

विठ्ठल मंदिर उघडणार : पंढरीत जल्लोष
पंढरपूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ७ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातील सर्व मंदिरे उघडणार आहेत. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार व्यक्त करत पंढरपूर शिवसैनिकांनी संत नामदेव महाराज महाद्वार प्रवेशद्वाराजवळ भाविक भक्तांना पेढे वाटून व आतषबाजी करून आनंद व्यक्त केला.
यावेळी माजी जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव, जयवंत माने, सुधीर अभंगराव, रवींद्र मुळे, पोपट सावतराव, तानाजी मोरे, विनय वनारे, बाबा अभंगराव, सचिन बंदपट्टे, अविनाश वाळके, समाधान अधटराव, सिद्धनाथ कोरे, पंकज डांगे, अरुण कांबळे, ईश्वर साळुंखे उपस्थित होते.
----
फोटो : २५ पंढरपूर
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी खुले होत असल्याने पेढे वाटून आनंद व्यक्त करताना शिवसेनेचे पदाधिकारी. ( छाया : सचिन कांबळे)