शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

विठ्ठल भक्तांसाठी 'विठाई' बससेवा आजपासून सेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 17:15 IST

राज्य परिवहन मंडळाचा उपक्रम

ठळक मुद्देपंढरपूर हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्रप्रवास, राहणे, जेवण एकाच पॅकेजमध्येखाजगी वाहतूकदारांची लूट थांबवणार

पंढरपूर : राज्यभरातून पंढरपुरला येणाºया भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने खास ‘विठाई’ बससेवा सुरू केली असून २४ डिसेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पंढरपुरात या सेवेचे लोकार्पण केले जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.

पंढरीत होणाºया महामेळाव्यासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ पंढरपूर हे वारकºयांचे तीर्थक्षेत्र आहे़ आषाढी एकादशीनिमित्त १० लाखांहून अधिक भाविक विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात येतात. शिवाय वार वारी आणि दररोज हजारो भाविकांची पावले पंढरीकडे वळतात. विठ्ठलभक्तांचा हा ओघ राज्याच्या कानाकोपºयातून सुरू असतो. अनेक भाविक परराज्यातूनही येतात. पंढरीत येण्यासाठी ठिकठिकाणाहून एसटीच्या नियमित बसेससह प्रासंगिक करारावर बस उपलब्ध करून दिल्या जातात. अनेक भाविक खासगी वाहनांने प्रवास करतात. पण अनेकदा त्यांना मार्गावर विविध अडचणींचा सामना करावा लागतो.

मुक्काम, जेवणाची गैरसोय होते. ही बाब लक्षात घेऊन महामंडळाने खास पंढरपूरला येणाºया भाविकांसाठी ‘विठाई’ ही नवीन बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला १० बस वारकºयांच्या सेवेत दाखल होतील. 

दापोडीत विठाई बसची निर्मितीदापोडी (पुणे) येथे या बसची निर्मिती करण्यात येत आहे. एसटीच्या प्रत्येक विभागात ही विठाई बस लवकरच दाखल होणार आहे. पंढरपूरला जाणाºया भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा, या हेतूने ‘विठाई’ची रचना आकर्षक बनवली आहे. बसच्या बॉडीवर विठ्ठल आणि वारकºयांचे चित्र आहे. पांढºया आणि लाल रंगात ती उठून दिसते. आरामदायी आसन व्यवस्था आहे. खिडक्या मोठ्या आणि हवेशीर आहेत. तसेच नियमित बसपेक्षा याची उंची वाढवली आहे. याशिवाय अ‍ॅल्युमिनियमऐवजी पोलादी पत्र्याचा वापर केला आहे. तसेच आरामदायक आसने, दोन आपत्कालिन दरवाजे असून एकूण ४२ प्रवाशांना बसण्याची व्यवस्था आहे.

भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी उपक्रमप्रासंगिक करार पध्दतीने सध्या जे भाडे आकारले जाते, त्या दरातही ही विठाई बस सेवा पुरविली जाणार आहे. त्यासाठी भाविकांना अगोदर गटागटाने नोंदणी करणे आवश्यक आहे़ या बसने प्रवास करणाºया भाविकांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्थाही एसटीकडूनच देण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे. एकाच पॅकेजमध्ये प्रवास, राहणे व जेवण या तिन्ही गोष्टी समाविष्ट असल्याने भाविकांची गैरसोय टळणार आहे. अत्यंत माफक दरात ही सेवा मिळेल. त्यामुळे खासगी वाहनांकडून होणारी आर्थिक लुटही थांबेल.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरShiv Senaशिवसेना