शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आता होणार ग्रीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 12:31 IST

हडपसरचे भाविक देणार ३५० झाडे अन् कुंड्या

ठळक मुद्देकुंड्यांमधून वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावण्यात येणार विठुरायाच्या दर्शनासाठी मंदिरात आलेल्या भाविकांना अधिक प्रसन्न वाटणार पहिल्या टप्प्यात ७५ कुंड्या एका ट्रकमध्ये मंदिर समितीला पोहोचवल्या

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या आतील व बाहेरील परिसरात पुणे येथील एक भाविक कुंड्यांसह विविध प्रकारची ३५० झाडे ठेवणार आहे. यामुळे आता श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ग्रीन होणार आहे.

हडपसर (पुणे) येथील नर्सरीचे मालक आर. व्ही. हिरेमठ यांनी समितीला मंदिराच्या बाहेरील बाजूस लावण्यासाठी वेगळी आणि मंदिराच्या आतील बाजूस लावण्यासाठी ३५० झाडे आणि कुंड्या मोफत देत आहेत. यासाठी त्यांना ५ लाख ५० हजारांच्या आसपास खर्च येणार आहे. त्यामध्ये त्यांनी पहिल्या टप्प्यात ७५ कुंड्या एका ट्रकमध्ये मंदिर समितीला पोहोचवल्या आहेत.

मंदिराच्या बाहेरील बाजूस अर्थात व्हीआयपी गेट, पश्चिमद्वार, महाद्वार, नामदेव पायरी तसेच मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर देखील सध्या बसविण्यात येत असलेल्या स्टीलच्या बॅरिेकेडिंगच्या कट्ट्यावर अशा प्रकारच्या कुंड्या ठेवण्यात येणार आहेत. या कुंड्यांमधून वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावण्यात येणार आहेत. यामुळे विठुरायाच्या दर्शनासाठी मंदिरात आलेल्या भाविकांना अधिक प्रसन्न वाटणार आहे.

या प्रकारची झाडे असणार मंदिरात आतील बाजूस म्हणजेच सावलीमध्ये मनीप्लँट, सेपलेरा, नागफणी (स्टँटीपायलम), झेनेड्रो आणि फिलोड्रेंड्राँन ही पाच ते सहा फूट उंच होणारी तर बाहेरील बाजूस उन्हात थंडावा देणारी आरेकापाम, पायकस ब्लँकीयाना आणि (रंगीबेरंगी) बोगन व्हेलीया ही पंधरा ते वीस फूट उंच होणारी रोपे लावण्यात येणार आहेत. श्री विठ्ठल मंदिरात माझ्या राजेश्वरी नर्सरीची शेकडो झाडे लावण्याची संधी मला मंदिर समितीने दिली. श्री विठ्ठलाच्या श्रद्धेमुळे मी कुंड्या व झाडे मंदिर समितीला मोफत देत आहे. - आर. व्ही. हिरेमठ भाविक, हडपसर, पुणे 

लाखो रुपयांच्या कुंड्यांसहित झाडे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिसरात लावण्यासाठी देत आहे. ७५ झाडे आणि कुंड्या मंदिर समितीकडे आलेली आहेत. काही दिवसांतच सर्वांना मंदिराचे नवे रूप पाहायला मिळेल. - बालाजी पुदलवाड व्यवस्थापक, मंदिर समिती, पंढरपूर

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpurपंढरपूर