शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडीओ क्लिप प्रकरण : श्रीकांत देशमुख, महिलेचा फोन बंद; सांगोल्यातही चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 11:23 IST

देशमुख यांच्या जागी भाजपचा नवा जिल्हाध्यक्ष कोण असेल याबद्दल चर्चा 

सोलापूर : भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख आणि एका महिलेचा बेडरूममधील व्हिडीओ मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावरून जिल्ह्याचे राजकारण तापले आहे. देशमुख आणि महिलेचा फोन बंद असल्याचे बुधवारी दिसून आले. दरम्यान, देशमुख यांच्या जागी भाजपचा नवा जिल्हाध्यक्ष कोण असेल याबद्दल चर्चा आहे.

देशमुख आणि महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही वेळातच एक ऑडिओ क्लीपही व्हायरल झाली. यादरम्यान देशमुख यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले. व्हिडीओ आणि ऑडिओ व्हायरल करणे हा विराेधकांचा कट असल्याचा आरोप देशमुखांनी केला होता. देशमुखांनी संबंधित महिलेवर गंभीर आरोप केले. यासंदर्भात महिलेची बाजू जाणून घेण्यासाठी महिलेला फोन केला असता मंगळवारी आणि बुधवारी फोन बंदच असल्याचे आढळून आले. भाजपचे अनेक कार्यकर्ते बुधवारी देशमुखांना फोन करीत होते. देशमुख आणि त्यांचे पी.ए. यांचेही फोन बंद आहेत.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आले. भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण होते. संजय राठोड, धनंजय मुंडे प्रकरणावरून भाजपच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना ट्रोल केले होते. आता देशमुख प्रकरणामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांची कोंडी झाली. सोशल मीडियावर भाजपच्या विविध व्हॉट्सॲप ग्रुपमधून देशमुख आणि त्यांच्या जवळच्या लोकांना काढण्यात आले. भाजपच्या प्रमुख नेत्यांनी यावर भाष्य करणे टाळले आहे.

सांगोल्याची बदनामी झाल्याची चर्चादेशमुख प्रकरणाचे तीव्र पडसाद सोशल मीडियावर उमटत आहे. सांगोल्याचे माजी आमदार स्व. गणपतराव देशमुख यांच्यासमोर राज्यातील नेते नतमस्तक व्हायचे. स्व. गणपतराव देशमुख यांच्यामुळे तालुक्याची उंची वाढली होती. महाविकास आघाडी सरकार संकटात आल्याने आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ऑडिओ क्लीपमुळे तालुका पुन्हा चर्चेत आला होता. काही लोकांनी या क्लीपचे कोतुक केले होते तर काही लोकांनी टीका केली होती. श्रीकांत देशमुख यांच्या प्रकरणामुळे तालुक्याची बदनामी झाल्याचा सूर सोशल मीडियावर उमटत आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर