तरुणीवर अत्याचार करून फोटो केले नातेवाइकांना व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:22 IST2021-04-25T04:22:15+5:302021-04-25T04:22:15+5:30

: माढा तालुक्यातील एका गावात तरुणीला २०१७ पासून लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केले. नंतर पीडितीने नकार देताच तिचे ...

Viral to relatives photographed abusing the young woman | तरुणीवर अत्याचार करून फोटो केले नातेवाइकांना व्हायरल

तरुणीवर अत्याचार करून फोटो केले नातेवाइकांना व्हायरल

: माढा तालुक्यातील एका गावात तरुणीला २०१७ पासून लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केले. नंतर पीडितीने नकार देताच तिचे नग्न, अर्धनग्न फोटो तिच्या नातेवाइकांच्या व्हाॅट्सॲपवर पाठविले. तरुणीच्या फिर्यादीवरून सचिन रिकीबे या तरुणावर कुर्डूवाडी पोलिसांत पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील पीडित तरुणी ही शिक्षण घेत असताना आरोपीसह तिची ओळख झाली. पुढे त्यांचे मैत्रीत रूपांतर झाले. नंतर आरोपीने आपण लग्न करणार आहोत म्हणून लॉज व काही ठिकाणी नेऊन तिच्यावर जबरदस्ती करत वारंवार अत्याचार केले. आता नकार देताच तुझ्या सोबतचे घाणेरडे फोटो व व्हिडिओ वायरल करेल, असा दम दिला, तरीही २३ एप्रिल रोजी सकाळी ७ च्या सुमारास पीडित तरुणीचे अर्धनग्न फोटो हे तिच्या नातेवाइकाच्या मोबाइल नंबरवर व्हायरल केले. ते फोटो व्हायरल झाल्याने बदनामी, बालकांचे लैंगिक अत्याचार व अपराधापासून संरक्षण कायद्यांतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे करीत आहेत.

Web Title: Viral to relatives photographed abusing the young woman