शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

वाहतूक नियमांचे उल्लंघन; खाकीचा धाक आहेच मग वाहनांवर ‘पोलीस’ हवं कशाला ?

By appasaheb.patil | Updated: September 6, 2022 10:38 IST

चारचाकी वाहनात दर्शनी भागात ठेवला जातोय बोर्ड अन् कॅप : दुचाकीवर झळकतो लोगो

सोलापूर : मुळात खात्याने दिलेली वर्दी हीच पोलिसांची सगळ्यात मोठी ओळख आहे. कर्तव्यावर नसताना ते सामान्य नागरिकच असतात. मात्र, तरीही स्वत:चा वेगळा रुबाब दाखविण्यासाठी जाणीवपूर्वक वाहतूक नियमांचे पालन होताना दिसत नाही. दरम्यान, अनेक पोलिसांच्या खासगी वाहनांवर पोलीस असे लिहिलेले असते. याच सर्वाधिक दुचाकीवर पोलीस आढळून आले, शिवाय खात्याचाही लोगो अनेक गाड्यांवर असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आले.

मोटार वाहन कायद्याप्रमाणे खासगी दुचाकी व चारचाकी वाहनांवर पोलीस असे लिहिणे कायद्याने दंडात्मक आहे. खासगी वाहनांवर खात्यातील कर्मचाऱ्यांनी लिहिणे कायद्याच्या चौकटीत बसत नाही. तरीही पोलीस अधिकारी, कर्मचारी सर्रास या नियमाची पायमल्ली करतात. वाहतूक पोलीसही जाणीवपूर्वक स्वत:च्या खासगी वाहनांवर पोलीस लिहितात. खात्याचा लोगोही वापरतात. सर्वसामान्यांच्या गाडीवर नियमानुसार कारवाई करणारे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पोलिसांच्या गाड्यांवर कधी कारवाई करणार याकडे आता सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.

-------------

कॅप अन् पोलीस बोर्ड गाडीसमोर...

आता तर काही अधिकारी आपल्या चारचाकी वाहनात खात्याने दिलेली पी कॅप दर्शनी भागावर ठेवतात, जेणेकरून टोल नाका, इतर ठिकाणी प्रवासात अडचण येऊ नये, विशेष सवलत मिळावी, असा त्यांचा प्रयत्न असतो. ही कृतीसुद्धा नियमात बसणारी नसल्याचे अनेकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

-------------

‘लोकमत’ला काय आढळले?

  • - अधीक्षक कार्यालय : पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर दुचाकी व चारचाकीसाठी पार्किंग व्यवस्था आहे. या पार्किंगमधील अनेक गाड्यांवर पोलीस लिहिलेले असते, शिवाय पोलिसांचा लोगोही असतो. अनेक चारचाकी खासगी वाहनात समोरील काचेजवळ पोलीस असलेला बोर्ड आढळून येतो.
  • -पोलीस आयुक्तालय : शहर पोलीस आयुक्तालयासमोर असलेल्या टाकीजवळ पोलिसांची वाहने पार्किंग केली जातात. या पार्किंगमध्ये अनेक दुचाकी वाहनांवर पोलीस लिहिल्याचे सर्रास पाहावयास मिळते. तेथेही कारवाई होत नाही.
  • -पोलीस ठाणे : ग्रामीण असो वा शहर पोलीस ठाणे परिसरात वाहने ठेवलेली असतात. या खासगी वाहनांवर पोलीस लिहिले जाते. खात्याचा लोगोही वापरला जातो.
  • -तालुका ठाणे : अनेक पोलीस कर्मचारी दुचाकीवर ठळक अक्षरात पोलीस लिहितात. शिवाय खासगी चारचाकी वाहनांवरही पोलीस लिहितात. एवढेच नव्हे तर अनेकांच्या गाड्यांवर पोलीस असल्याचे पहावयास मिळते.

-----------

आठ महिन्यांत एकाही वाहनावर कारवाई नाही

मोटार वाहन कायद्याप्रमाणे दुचाकी व अन्य खासगी वाहनांवर पोलीस वा अन्य काही लिहिणे दंडनीय गुन्हा आहे. मात्र, या कायद्याची अंमलबजावणी होत नाही. मागील आठ महिन्यांत एकाही वाहनावर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाई करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले.

----------------

नियम सर्वांना सारखाच

मोटार वाहन कायद्यातील तरतुदी अतिशय स्पष्ट आहेत. ज्या वाहनांची नोंदणी ठराविक कामासाठी झाली, त्यावरच असे लिहिता येते. नियमबाह्य लिहिणे चुकीचे आहे. शिवाय खासगी वाहनांवर पोलीस लिहिणे अत्यंत चुकीचे आहे. योग्य ती कारवाई होईल.

- अर्चना गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरPoliceपोलिसRto officeआरटीओ ऑफीस