शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाशी लढा; 'पाणी फाउंडेशन' च्या मदतीने शेलगावात तयार होतेय पौष्टीक गवताची नर्सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 09:08 IST

कुरण क्षेत्र वाढण्यास होणार मदत; दुष्काळावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांचा पुढाकार

जेऊर : दुष्काळ पडला की मोठा प्रश्न उभा राहतो तो जनावरांच्या चराईचा आणि त्यामुळेच महाराष्ट्राच्या गावाखेड्यांमधील गोठ्यातली जनावरं चारा छावण्यांमध्ये बांधण्याची वेळ बळीराजावर येते. जनावरांची पौष्टिक चाऱ्याची गरज भरून निघावी आणि पौष्टिक व सकस गवत गावातच उपलब्ध व्हािवा या उद्देशाने शेलगाव क ( ता. करमाळा) या गावांमध्ये गावकऱ्यांच्या सहकार्याने  शेतकऱ्यांनी सरी पाडून, बेड्स तयार करून पोस्टीक गवताची पाच गुंठ्यांत लागवड करण्यात आली आहे.

या पाच गुंठा मध्ये पांढरी आंजण-काळी, आंजण, धामण, मारवेल, रोडस -डोंगरी, पवण्या शेडा, पांढरी कुसळ इत्यादी जातीच्या गवताची नर्सरी तयार करण्यात आली आहे. गवताची पूर्ण वाढ झाल्यानंतर यावर्षी पाणी फाउंडेशन 'समृद्ध गाव स्पर्धा' च्या माध्यमातून स्पर्धेत सहभाग घेतलेल्या गावांना पौष्टीक गवत वाटण्यात येणार आहे.  करमाळा तालुक्यातील कुरण धन वाढवण्यासाठीचा हा प्रयत्न शेतकऱ्यांच्या मदतीने यशस्वी होईल आणि तालुक्यातील गावागावांमध्ये संरक्षित कुरण क्षेत्र विकसित झालेली पहायला मिळतील असा विश्वास तालुका समन्वयक  प्रतीक गुरव यांनी 'लोकमत' शी बोलताना व्यक्त केला.–------------------------पौष्टीक गवतांचे क्षेत्र वाढवण्यास होणार मदतजनावरांना चराईसाठी मोकाट सोडणे, बेसुमार तोड यांमुळे जनावरांना चाऱ्याचा प्रश्न उपस्थित होतो. यातून अनेक गवत नामशेष होते या नामशेष होऊ लागलेल्या पौष्टीक गवतांना नर्सरी च्या माध्यमातून पुनरूज्जीवित करून त्यांचा प्रसार महाराष्ट्रातील गावा-गावात करण्यासाठी पानी फाउंडेशनने काम करत आहे. यातून कुराणाचे व पौष्टीक गवतांचे क्षेत्र वाढवण्यास मदत  होणार आहे.

 

भविष्यात जनावरांना पौष्टिक चारा उपलब्ध व्हावा यासाठी प्रत्येक गावाने गायरान वनात,उपलब्ध सार्वजनिक जमिनीवर अथवा बांधावर चराई बंदी करून पौष्टिक गवताची लागवड करून जनावरांनसाठी राखीव चाऱ्याचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे.म्हणजे ज्यावेळेस आपल्या कडे चाऱ्याची कमतरता भासेल त्यावेळी जनावरांना तो राखीव चारा उपलब्ध होईल.आणि निश्चितच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटण्यासाठी मदत होईल - प्रतिक गुरवतालुका समन्वयक, करमाळा, पाणी फाउंडेशन

टॅग्स :SolapurसोलापूरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाkarmala-acकरमाळाagricultureशेतीdroughtदुष्काळ