शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

विजयदादांनी पंधरा दिवसांत दोनदा घेतली गणपतराव देशमुख यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 11:55 IST

भाजपा-शिवसेना नेतेमंडळींच्या सतत होणाºया भेटीगाठीमुळे सांगोल्यात राजकीय चर्चेला उधाण

ठळक मुद्देखा. विजयदादांनी गेल्या १५ दिवसांच्या कालावधीत शेकापचे आ. गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन दोन वेळा भेट घेतल्याने त्यांच्या या भेटीवरून राजकीय चर्चा होत आहेत. माढा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांची उमेदवारी निश्चित होऊन विधानसभा मतदार संघातील नेतेमंडळी त्यांच्या प्रचारास लागले आहेत

सांगोला: खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांचा सांगोल्यातील वाढता संपर्क आणि भाजपा-शिवसेना नेतेमंडळींच्या सतत होणाºया भेटीगाठीमुळे सांगोल्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. 

खा. विजयदादांनी मंगळवारी सांगोल्यात आल्यानंतर दिवसभरात शेकापचे आ. गणपतराव देशमुख, शिवसेनेचे माजी आमदार अ‍ॅड. शहाजीबापू पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. पी. सी. झपके, भाजपाचे तालुकाध्यक्ष श्रीकांत देशमुख, महायुतीच्या नगराध्यक्षा राणी माने, भाजपाच्या नेत्या राजश्री नागणे-पाटील यांच्यासह समर्थकांच्या भेटी घेऊन लोकसभा निवडणुकीविषयी चर्चा केल्याचे समजते. मात्र त्यांनी या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ लावू नये, असे सांगण्यास ते विसरले नाहीत. खा. विजयदादांनी गेल्या १५ दिवसांच्या कालावधीत शेकापचे आ. गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन दोन वेळा भेट घेतल्याने त्यांच्या या भेटीवरून राजकीय चर्चा होत आहेत. 

माढा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांची उमेदवारी निश्चित होऊन विधानसभा मतदार संघातील नेतेमंडळी त्यांच्या प्रचारास लागले आहेत. माढा मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार अद्यापही निश्चित नसल्याने भाजपा-शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. फलटणचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या भाजपा प्रवेशानंतर त्यांच्याही कार्यकर्त्यांनी सांगोल्यात येऊन भाजपा-शिवसेना पदाधिकाºयांच्या भेटी घेऊन चाचपणी केली होती. 

खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी मंगळवारी सकाळी नगरसेवक सतीश सावंत यांच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. तेथून त्यांनी त्यांच्या समर्थकांच्या भेटी घेऊन आ. गणपतराव देशमुख यांची भेट घेतली. त्यानंतर माजी आ. शहाजीबापू पाटील यांची भेट घेऊन भाजपाचे तालुकाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी श्रीकांत देशमुख यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत करून राजकीय घडामोडींवर चर्चा केली. त्यानंतर नगराध्यक्षा राणी माने, नगरसेवक आनंदा माने, स्वाभिमानीचे प्रा. संजय देशमुख, माजी उपसभापती संतोष देवकते यांच्याही भेटी घेतल्या. खा. विजयसिंह मोहिते-पाटील मंगळवारी दिवसभर सांगोल्यात ठाण मांडून असल्याने राजकीय चर्चेला उधाण आले होते.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलGanpatrao Deshmukhगणपतराव देशमुखBJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक