शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Video : विनोद तावडेंचा माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभाग, विद्यार्थ्यांच्या स्वच्छता मोहिमेचं केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2019 16:15 IST

भागवत धर्माची पताका उंचावत टाळ, मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करीत आज उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे नातेपुते येथे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले.

ठळक मुद्देटाळ, मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करीत आज उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे नातेपुते येथे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले.नातेपुते ते मांडवे या पालखीच्या मार्गामध्ये वारकऱ्यांबरोबर पायी चालत व वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी हा मार्ग पूर्ण केला.तावडे यांनी वारकऱ्यांबरोबर टाळ आणि मृदुंगाचा ताल धरला आणि मुखाने जय हरी विठ्ठलाचा जप केला. 

सोलापूर - भागवत धर्माची पताका उंचावत टाळ, मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करीत आज उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे नातेपुते येथे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले. नातेपुते ते मांडवे या पालखीच्या मार्गामध्ये वारकऱ्यांबरोबर पायी चालत व वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी हा मार्ग पूर्ण केला. यावेळी तावडे यांनी वारकऱ्यांबरोबर टाळ आणि मृदुंगाचा ताल धरला आणि मुखाने जय हरी विठ्ठलाचा जप केला. 

वारी म्हणजे परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होण्याचा मार्ग आहे. वारीच्या माध्यमातून समाजाला समाजामध्ये जाऊन पाहणे व त्या समाजाकडून सकारात्मक गोष्टी शिकणे तसेच वारकऱ्यांची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा असा संदेश देणारी ही वारी असते. पंढरपूरच्या या आषाढी वारीला राज्य सरकारच्या वतीने सर्व सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत असेही तावडे यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांच्या स्वच्छता मोहिमेचं त्यांना कौतुक केलं आहे. 

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन

 हरिनामाचा जयघोष आणि टाळ-मृदंगाचा गजर करत देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले. सोलापूर व पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सराटी पुलावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, माजी झेडपी अध्यक्ष मदनसिंह मोहिते-पाटील, सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, उपसभापती किशोर सूळ, प्रांताधिकारी शमा पवार, तहसीलदार अभिजीत पाटील, गटविकास अधिकारी स्मिता पाटील उपस्थित होते.

संत तुकाराम महाराज पालखीच्या स्वागतासाठी सकाळी सात वाजल्यापासूनच वारकरी, भाविक, तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांची गर्दी होऊ लागली होती. निरा नदी ओलांडून सुमारे ८.३० च्या सुमारास तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन झाले. पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी अश्वपूजन व पादुकांचे पूजन केले. त्यानंतर पालखी सोहळा अकलूजच्या दिशेने मार्गस्त झाला.

अकलूज शहरातर्फे माजी खा. विजयसिंह मोहिते-पाटील, माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील, सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, उपसरपंच धनंजय देशमुख, नंदिनीदेवी मोहिते-पाटील, सत्यप्रभादेवी मोहिते-पाटील, संकल्प डोळस यांच्यासह  पदाधिकारी, अधिकारी व अकलूजचे ग्रामस्थ उपस्थित होते. यावर्षी अकलूज येथे पालखी सोहळ्यासाठी प्रथम पोलीस बँडचे आयोजन केले होते. यानंतर पालखी सोहळा अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात दाखल झाला.

 

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीVinod Tawdeविनोद तावडेSolapurसोलापूर