शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

Video : चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलतानाही ST कर्मचाऱ्याला रडू कोसळलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 20:02 IST

आज सकाळीच एका एसटी चालकाने बसगाडीच्या मागील शिडीला फाशी घेऊन आत्महत्या केली. या घटनेनं महाराष्ट्र सुन्न झाला आहे. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी व्यथा आणि दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे

ठळक मुद्देकालच औसा येथे एसटी कर्मचाऱ्यांशी बोलताना त्यांच्या व्यथा ऐकून उद्विग्न झालो होतो. आज चालकानं एसटीतच आत्महत्या केल्याची बातमी आली. शेतकऱ्यानं शेतात केलेल्या आत्महत्येइतकंच हे भीषण आहे.

सोलापूर - एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण, पगारवाढ, महागाई भत्ता वाढावा आदी मागण्यांसाठी ST कर्मचाऱ्यांकडून बेमुदत संप सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज सोलापुरात आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेतली. सरकार जर दुर्लक्ष करणार असेल, तर आम्हाला ST कर्मचाऱ्यांसाठी रस्त्यावर उतरावं लागेल, असा इशाराच यावेळी दिला. चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ST मधील एका कर्चचाऱ्याचा रडतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आपल्यावरील अन्याय दूर करण्याची मागणी करत एसटी कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू होते.

आज सकाळीच एका एसटी चालकाने बसगाडीच्या मागील शिडीला फाशी घेऊन आत्महत्या केली. या घटनेनं महाराष्ट्र सुन्न झाला आहे. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी व्यथा आणि दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. सोलापूरमध्येही आज तेच चित्र पाहायला मिळालं. भाजप नेते चंद्रकांत पाटील सोलापूर दौऱ्यावर असताना काही कर्मचाऱ्यांना रडू कोसळलं. वाढती महागाई आणि नोकरीतून मिळणार कमी पगार, अनियमितता तसेच विविध समस्यांमुळे कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. चंद्रकांत पाटील मीडियाशी संवाद साधत असतानाही या कर्मचाऱ्यांना रडू कोसळलं. आकाशी रंगाचा टी शर्ट घातलेला तरुण चंद्रकांत पाटील यांच्या पाठीमागे रडत असल्याचं दिसून येतंय.    कालच औसा येथे एसटी कर्मचाऱ्यांशी बोलताना त्यांच्या व्यथा ऐकून उद्विग्न झालो होतो. आज चालकानं एसटीतच आत्महत्या केल्याची बातमी आली. शेतकऱ्यानं शेतात केलेल्या आत्महत्येइतकंच हे भीषण आहे. हा आक्रोश मविआ सरकारच्या कानी जात नाही? आत्महत्या नव्हे, ही तर सरकारी कारभारातून झालेली हत्याच असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.   

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलSolapurसोलापूरST Strikeएसटी संपBus Driverबसचालक