VIDEO : शिस्तप्रिय पक्षाच्या बेशिस्त मुलाखती

By Admin | Updated: January 24, 2017 17:32 IST2017-01-24T17:26:09+5:302017-01-24T17:32:36+5:30

ऑनलाइन लोकमत सोलापूर, दि. 24 - शिस्तप्रिय पक्ष म्हणून बिरुदावली मिरविणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यानी आज मंत्री अन पदाधिकाऱ्यांसमोरच बेशिस्तीच दर्शन ...

VIDEO: The Disciplined Party's Undisclosed Interviews | VIDEO : शिस्तप्रिय पक्षाच्या बेशिस्त मुलाखती

VIDEO : शिस्तप्रिय पक्षाच्या बेशिस्त मुलाखती

ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 24 - शिस्तप्रिय पक्ष म्हणून बिरुदावली मिरविणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यानी आज मंत्री अन पदाधिकाऱ्यांसमोरच बेशिस्तीच दर्शन घडविले. 
सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या आज निवडणुका झाल्या. त्यासाठी सकाळी दहा वाजल्यापासून महावीर मंगल कार्यालयासमोर इच्छुक उमेदवारानी शक्ती प्रदर्शन करताना एकच गर्दी केली. ज्या सभागृहात मुलाखती घ्यायच्या तेथेही सर्वे उमेदवार अन कार्यकर्ते एकत्र येउन आपापल्या नेत्याचा जयघोष सुरु केला. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, खा. शरद बनसोडे, शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांच्या समोरच हा गोंधळ सुरु होता त्यामुळे त्याना उमेदवाराच्या मुलाखतीत ना प्रश्न विचारता येत होते ना त्यानी दिलेले उत्तर एकू येत होते. अनेकदा कार्यकर्त्याना शांत राहण्याच आवाहन करुनही कार्यकर्ते शांत होत नव्हते.
त्यामुळे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यानी ब्रेकच निमित्त करुन काही वेळासाठी सभागृहातून बाहेर जाण पसंत केल. त्या पाठोपाठ सहकारमंत्री सुभाष देशमुख यानीही मुलाखती सोडून शेजारच्याच एका कक्षात थोडी उसंत घेतली. व पुढच्या मुलाखती कशात घेण्यासाठी तेथेच खासदाराना बोलावून घेतल. मात्र इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यनी त्या कशासमोरही मोठी गर्दी केली. थोड्या वेळात पालक मंत्री मुलाखत सुरु असलेल्या सभागृहात पोचले तेंव्हा मुलाखती कशात सुरु असल्याचा निरोप त्याना मिळाला. त्यामुळे ते पुन्हा कशाकड निघाले. मात्र बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी अन रेटारेटी इतकी होती की पालकमंत्र्यांच्या स्विय सहाय्यकाना गर्दी हटवून त्याना वाट काढून द्यावी लागली.  अशा गोंधळातच आज प्रभाग एक ते तेरा च्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उरकल्या. मात्र उद्या असा गोंधळ होउ देवू नका अशा सूचना मंत्र्यानी शहर पदाधिकार्याना दिल्या.
 

https://www.dailymotion.com/video/x844pc1

Web Title: VIDEO: The Disciplined Party's Undisclosed Interviews

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.