VIDEO- पंढरपुरात एकाच रात्री आठ दुकाने फोडली

By Admin | Updated: August 28, 2016 21:07 IST2016-08-28T11:49:11+5:302016-08-28T21:07:21+5:30

पंढरपूर येथील आठ दुकानात सुरक्षिततेसाठी असलेल्या सीसीटीव्हीच्या यंत्रणेला ठेंगा दाखवत लाखो रुपयांची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे.

VIDEO- 8 shops at Pandherpur in the same night | VIDEO- पंढरपुरात एकाच रात्री आठ दुकाने फोडली

VIDEO- पंढरपुरात एकाच रात्री आठ दुकाने फोडली

style="text-align: justify;">सचिन कांबळे 
पंढरपूर, दि. २८ - पंढरपूर येथील आठ दुकानात सुरक्षिततेसाठी असलेल्या सीसीटीव्हीच्या यंत्रणेला ठेंगा दाखवत लाखो रुपयांची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे. यामध्ये दोन मोबाईल शॉपमधील अंदाजे सात लाख रुपयांचा मालाची चोरी झाली आहे. ही घटना नवीपेठ परिसरात रविवारी पहाटे दिड ते चारच्या सुमारास घडली आहे.
 
पंढरपूर शहरातील नवीपेठ परिसरात भाजी मंडई याठिकाणी शहरासह तालुक्यातील नागरीक खरेदीसाठी येतात. यामुळे या परिसरात नागरीकांची वर्दळ असल्याने किराणा दुकाने, मोबाईल अन्य विविध वस्तुची दुकाने मोठ्या प्रमाणात आहे. मात्र यातील अनेक व्यापारी दुकाने बंद करुन रात्री आपल्या घरी जातात. यामुळे या परिसरात रात्री शुकशुकाट असतो. 
 
याचा फायदा घेत अज्ञात चोरटांनी रविवारी पहाटे दिड ते साडे तीन या कालावधीत आठ दुकानात चोरी केली आहे. किरणा दुकान, कपड्याचे दुकान व मोबाईल दुकान सह छोट्या दुकानात चोरी झाली आहे. मोबाईल शॉपीमध्ये मोठ्या प्रमाणात चोरी झाली आहे. तर किरणा दुकानातील सुट्टे पैसे पळविले आहे.
 
शिवम मोबाईल शॉपी मधील टि.व्ही. कॅमेरा दुस-या बाजुला सरकविण्याचा प्रयत्न चोरांनी केला. परंतु त्यामध्ये त्यांना यश आले नाही. यामुळे सीसी टीव्ही. कॉमरेमध्ये सर्व प्रकाराचे चित्रकरण झाले आहे. मात्र चोरी करत असताना दोन चोरटयांनी चहे-याला कापड बांधले होते. यामुळे सीसी टिव्ही कॅमे-यामध्ये चोरांचे चेहरे कैद झाले नाही. सकाळी चोरी झाल्याचे समजताच दुकान मालकाने पोलीसांना कळविले. 
 

Web Title: VIDEO- 8 shops at Pandherpur in the same night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.