शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीवर ब्लेडने वार करून तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न, सोलापूरातील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 14:44 IST

दोघे गंभीर : मेकॅनिकी चौक येथील प्रकार

ठळक मुद्दे फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल दोघे गंभीर जखमी, उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखलमुलीस तिच्या नातेवाईकांनी एका खासगी रूग्णालयात दाखल केले

सोलापूर : मुलीच्या घरच्यांचा लग्नास विरोध असल्याने चिडलेल्या तरूणाने प्रेयसीवर ब्लेडने वार करून स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार मेकॅनिकी चौकातील पिझ्झा सेंटरवर घडला. 

सूरज रेवणसिद्ध म्हमाणे (वय २२, रा. ताडीवाला रोड, सारीपुत्त बुद्ध विहार, पुणे) हा आपल्या प्रेयसीबरोबर एका हॉटेलमध्ये आला होता. प्रेयसी बरोबर गप्पा मारत असताना दोघांमध्ये लग्नावर चर्चा झाली. मुलीच्या घरच्यांचा याला विरोध असल्याचे लक्षात येताच सूरज म्हमाणे याने पे्रयसीवर ब्लेडने वार केले. एवढ्यावर न थांबता त्याने स्वत:च्या गळ्यावर ब्लेडने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 

दोघे गंभीर जखमी झाले. सूरज म्हमाणे याला आकाश धुळे याने उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले. मुलीस तिच्या नातेवाईकांनी एका खासगी रूग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी रात्री उशिरा फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.

एकमेकांचे नातेवाईक...- सूरज म्हमाणे व मुलगी हे दोघे नातेवाईक आहेत. मुलगा पुणे येथे राहतो तर मुलगी हैदराबाद येथील आहे. दोघांचे नातेवाईक सोलापुरात राहतात. ते दोघे नातेवाईकांकडे येत असतात. १५ दिवसांपूर्वी मुलाच्या नातेवाईकांनी मुलीच्या आई-वडिलांना मुलगी देता का असे विचारले होते. मुलीच्या घरच्यांनी या प्रस्तावाला नकार दिला होता. या कारणावरून हा प्रकार घडला असावा. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर योग्य ती कारवाई व योग्य तो तपास केला जाईल अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारी