शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
3
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
4
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
5
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
6
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
7
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
8
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
9
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
10
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
11
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
12
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
13
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
14
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
15
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
16
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
17
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
18
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
19
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
20
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला

वाहनांची तपासणी करणाºया ४१ ठिकाणी सीसी कॅमेरे लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 13:49 IST

प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रात केवळ महिला अधिकारी व कर्मचाºयांचीच नेमणूक करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध ४१ तपासणी पथके तैनात करण्यात आली तपासणीदरम्यान १0 लाखांपेक्षा जास्त रक्कम आढळून आल्यास ती आयकर विभागाकडे देण्यात येणारमतदानाबाबत जनजागृती वाढावी यासाठी व्यापक जनजागृती कार्यक्रमही राबविण्यात येणार

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या काळात वाहनांची तपासणी करण्यासाठी प्रमुख रस्त्यांवर पोलिसांसह ४१ तपासणी पथके स्थापन करण्यात आली आहेत. तपासणी नाका असणाºया ठिकाणी सीसी कॅमेरे तैनात करण्यात येत असून, ही तपासणी पारदर्शक करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. 

लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत शुक्रवारी सायंकाळी डॉ. भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तपासणी नाका ठिकाणी जप्त करण्यात येणाºया रकमेबाबत पथकाकडून जागीच निर्णय घेऊ नये. तपासणीदरम्यान आढळून आलेली रक्कम ही खर्च नियंत्रण विभागाकडे सुपूर्द करणे आवश्यक आहे. खर्च नियंत्रण विभागात यासाठी स्थापन करण्यात आलेली समिती  अंतिम निर्णय घेईल, असेही त्यांनी सांगितले. 

सोलापूर लोकसभेसाठी १८ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येत आहे. मतदानासाठी आवश्यक असलेल्या सर्व साहित्यांचे वितरण १६ रोजी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मोहोळ येथील शासकीय धान्य गोदामातून, सोलापुरातील नॉर्थकोट मैदानावर,नूतन मराठी विद्यालय, अक्कलकोट तहसील,सोरेगाव एसआरपी कॅम्प, पंढरपूर धान्य गोदाम येथून निवडणुकीत अधिकारी व कर्मचाºयांना ईव्हीएम मशीन व अन्य आवश्यक साहित्य साधनसामुग्री देऊन त्यांना मतदान केंद्राकडे रवाना करण्यात येणार आहे. 

सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान घेण्यात येणार आहे. मतदानाची प्रक्रिया निर्भयपणे व्हावी, यासाठी १५ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवार, राजकीय प्रतिनिधी यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्यात आली आहे. मतदानाबाबत जनजागृती वाढावी यासाठी व्यापक जनजागृती कार्यक्रमही राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. 

दहा लाखांपुढील रक्कम आयकर विभागाकडे - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध ४१ तपासणी पथके तैनात करण्यात आली आहेत़ तपासणीदरम्यान १0 लाखांपेक्षा जास्त रक्कम आढळून आल्यास ती आयकर विभागाकडे देण्यात येणार आहे. याबाबत कोणतीही कागदपत्रे असली तरीही ही रक्कम आयकर विभागाकडेच सादर करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.

सहा मतदान केंद्रांत फक्त महिलांचेच राज्यनिवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रात केवळ महिला अधिकारी व कर्मचाºयांचीच नेमणूक करण्यात येणार आहे. सखी मतदान केंद्र असे नाव या मतदान केंद्राला देण्यात येत आहे. सोलापुरातील शरदचंद्र पवार प्रशाला, अक्कलकोट येथील शहाजी हायस्कूल, सोलापुरातील विक्री कार्यालय, नेताजी सुभाषचंद्र शाळा आदी ठिकाणी हा उपक्रम घेण्यात येत आहे. 

साडेपाचला होणार प्रात्यक्षिक १८ एप्रिल रोजी सकाळी सात वाजल्यापासून मतदान घेण्यात येणार आहे. तत्पूर्वी पहाटे साडेपाच वाजता मतदान केंद्रात असणाºया मतदान मशीनचे प्रात्यक्षिक घेण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणूक अधिकारी व कर्मचाºयांचा मतदान केंद्रात एक मुक्काम व पहाटेपासून काम असणार आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरmadha-pcमाढाSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग