कुर्डूूवाडीत भाजी मंडईतील गर्दी रोखण्यासाठी चार ठिकाणी होणार भाजी विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:21 IST2021-04-10T04:21:54+5:302021-04-10T04:21:54+5:30
शहरातील आजाद मैदान येथे एकाच ठिकाणी भाजी विक्री होत असल्याने येथे मोठी गर्दी होत होती. शहरातील वाढती कोरोना ...

कुर्डूूवाडीत भाजी मंडईतील गर्दी रोखण्यासाठी चार ठिकाणी होणार भाजी विक्री
शहरातील आजाद मैदान येथे एकाच ठिकाणी भाजी विक्री होत असल्याने येथे मोठी गर्दी होत होती. शहरातील वाढती कोरोना रुग्णसंख्या यावर आवर घालणे गरजेचे बनले आहे म्हणून शहरातून फिरणाऱ्या लोकांना नगरपालिकेच्या व पोलिसांच्या वतीने ध्वनिक्षेपकावरून या सूचना दिल्या आहेत.
आता शहरातील मार्केट यार्ड टेंंभुर्णी रोड, श्री राम मंदिर, महात्मा फुले कॉलेज परिसर व छत्रपती शिवाजी महाराज शाळा नंबर -१ या ठिकाणी भाजी मंडई बसणार आहे, असे पायगण यांनी सांगितले.
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शासनाने मिनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे नागरिकांना वारंवार प्रशासनाकडून मास्क वापरण्याबरोबरच सॅनिटायझर बाळगणे याबाबत सूचना दिल्या आहेत; परंतु भाजी विक्रेते व अनेक भाजी घेणारे नागरिकदेखील याची अंमलबजावणी करत नाहीत. त्यामुळे येथून धोका निर्माण होत आहे.
.................