एका जागेसाठी वटवटे, भांबेवाडी गावाने लावले कामाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:56 IST2021-01-13T04:56:33+5:302021-01-13T04:56:33+5:30
यातील वटवटे व भांबेवाडी येथील एक जागा बिनविरोध न झाल्याने या गावात मतदान होणार आहे. या एका जागेसाठी अख्खे ...

एका जागेसाठी वटवटे, भांबेवाडी गावाने लावले कामाला
यातील वटवटे व भांबेवाडी येथील एक जागा बिनविरोध न झाल्याने या गावात मतदान होणार आहे. या एका जागेसाठी अख्खे गाव कामाला लागले आहे. वटवटे ग्रामपंचायतीमध्ये ३ प्रभाग असून, ७ पैकी ६ जागा बिनविरोध झाल्या आहेत, तर भांबेवाडी येथे ३ प्रभाग असून, यातील ९ पैकी ८ जागा बिनविरोध झाल्या आहेत.
दोन्ही गावांतील एका जागेसाठी निवडणूक होणार आहे.
तालुक्यातील बहुचर्चित खंडाळी ग्रामपंचायतीमध्ये मात्र एकही जागा बिनविरोध झाली नाही. त्यामुळे इथे निवडणूक होणार आहे. तालुक्यातील अन्य १७ गावांतील काही प्रभागांतील काही जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी उर्वरित जागांसाठी मात्र या गावात सामना रंगला आहे. मोहोळ तालुक्यातील ४६ ग्रामपंचायती अशा आहेत त्यामधील एकही जागा बिनविरोध न झाल्याने या ४६ गावांतील सर्व प्रभागांत निवडणूक होणार आहे.
बिनविरोध निवडून आलेल्या गावांची सदस्य संख्या
निवडणूक लागलेले मात्र त्या ग्रामपंचायतमध्ये काही प्रभागांत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या
गावाचे नाव व कंसात बिनविरोध निवडून आलेले उमेदवार वटवटे ६, भांबेवाडी ८, कोरवली ३, नांदगाव ५, मनगोळी, भैरववाडी ५, रामहिंगणी ५, जामगाव बु. ६, शिंगोली तरटगाव २, दादपूर २, स. वरवडे १, बोपले ३, नरखेड २, एकुरके १, कोळेगाव १, मिरी १, आष्टे ४, मुंढेवाडी २.