तावडीच्या सरपंचपदी वर्षा अरगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:16 IST2021-06-25T04:16:52+5:302021-06-25T04:16:52+5:30

पानगांव : तावडी (ता. बार्शी) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वर्षा गणेश अरगडे यांची बिनविरोध निवड झाली. मारुती भैरवनाथ ग्रामविकास आघाडीचे पाच ...

Varsha Argade as Sarpanch of Tawdi | तावडीच्या सरपंचपदी वर्षा अरगडे

तावडीच्या सरपंचपदी वर्षा अरगडे

पानगांव : तावडी (ता. बार्शी) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वर्षा गणेश अरगडे यांची बिनविरोध निवड झाली.

मारुती भैरवनाथ ग्रामविकास आघाडीचे पाच सदस्य, तर विरोधी दोन सदस्य निवडून आले होते. या आघाडीतील वर्षा अरगडे यांचा अर्ज राहिल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सर्कल शरद शिंदे यांनी काम पाहिले, तर प्रशासकीय बाबी तलाठी गोटे, ग्रामसेवक डी. के. पाडुळे यांनी पाहिल्या. या निवडीवेळी ग्रामपंचायत सदस्य ज्योती मोरे, आश्विनी कोळी, सतीश कोळी, रमेश अरगडे यांच्यासह गावातील प्रमुख मंडळी उपस्थित होते.

वर्षा अरगडे यांच्या निवडीबद्दल आमदार राजेंद्र राऊत, बाजार समितीचे अध्यक्ष रणवीर राऊत यांनी कौतुक केले आहे.

Web Title: Varsha Argade as Sarpanch of Tawdi