अंबिकादेवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:47 IST2021-02-05T06:47:54+5:302021-02-05T06:47:54+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामदैवत श्री अंबिकादेवी मंदिरात बनशंकरी व चौडेश्वरी या देवीचा नवरात्रोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. देवी मंदिरात ...

अंबिकादेवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम
गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामदैवत श्री अंबिकादेवी मंदिरात बनशंकरी व चौडेश्वरी या देवीचा नवरात्रोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. देवी मंदिरात घटस्थापना करून शाकंबरी महोत्सवाचा शुभारंभ केला. गेले सहा दिवस मंदिरात सकाळी-संध्याकाळी देवीचे धार्मिक विधी, भजन-गायन यासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
दुपारी महाआरतीनंतर देवीला पालेभाज्यांसह महानैवेद्यही दाखविण्यात आला. उत्सव काळात मंदिराचे पुजारी दत्तात्रय गुरव यांनी नित्योपासना केली. मयुरेश गुरव, संतोष गुरव, ओंकार गुरव, तुकाराम गुरव यांनी नवरात्र महोत्सवासाठी परिश्रम घेतले.
कोट :::::::::::::::::::::
शाकंबरी नवरात्र महोत्सव हा पौष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमेपर्यंत केला जातो. पूर्वीच्या काळी पृथ्वीतलावर सतत १२ वर्षे महाभयंकार दुष्काळ पडल्याने पशु-पक्षी, मनुष्यप्राणी अन्नपाण्यावाचून तडफडून मरत होते. याची ऋषी मुनींना दया आली. देवीने भरपूर पाऊस पाडला आणि प्रथम शाक (पालेभाज्या) उगवल्या. त्या देवीला नैवेद्य म्हणून दाखवून सर्व भक्तांनी प्रसाद भक्षण केले. दुष्काळानंतर प्रथम शाक उत्पन्न झाले, ते ईश्वरीने दिले म्हणून त्याचे नाव शाकंबरी पडले. म्हणून हा दिवस शाकंबरी पौर्णिमा उत्सव साजरा केला जातो.
- दत्तात्रय गुरव
पुजारी
फोटो ओळी ::::::::::::::::::::::
शाकंबरी पौर्णिमेनिमित्त शुक्रवारी ग्रामदैवत श्री अंबिका देवीची ४० फळे व पालेभाज्यांनी आकर्षक पूजा बांधल्याचे छायाचित्र.