बार्शीत बंद दिवशी सफाईसाठी हॉटेल उघडल्याने जमावाकडून तोडफोड; २७ हजार लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:17 IST2020-12-09T04:17:58+5:302020-12-09T04:17:58+5:30

याबाबत हॉटेल व्यावसायिक शंकर सुग्रीव सोलवट यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मंगळवारी सकाळी अर्धवट हॉटेल ...

Vandalism from the crowd as the hotel opened for cleaning on a closed day in Barshi; 27 thousand lamps | बार्शीत बंद दिवशी सफाईसाठी हॉटेल उघडल्याने जमावाकडून तोडफोड; २७ हजार लंपास

बार्शीत बंद दिवशी सफाईसाठी हॉटेल उघडल्याने जमावाकडून तोडफोड; २७ हजार लंपास

याबाबत हॉटेल व्यावसायिक शंकर सुग्रीव सोलवट यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मंगळवारी सकाळी अर्धवट हॉटेल उघडून कामगार आतील साफसफाई काम करत होते तर फिर्यादी व रामेश्वर थिटे बाहेर येऊन भाजीपाला व इतर साहित्य खरेदीबाबत चर्चा करत होते. अचानक बिगर नंबरच्या दोन दुचाकीवरून व एक रिक्षातून २५ ते ३० वयोगटातील १४ ते १५ जण आत घुसत असताना अडविले असता फिर्यादीस ढकलून शटर्स उघडून आत शिरले. हातातील लाकडी दांडक्यांनी कोल्ड्रिंग फ्रीज व इतर साहित्याची तोडफोड केली. विरोध करताच तुम्ही मध्ये पडल्यास तुम्हालाही फोडून काढू, अशी धमकी दिली. त्यांनी तोडफोड करून त्यातील दोघांनी काउण्टरमधील २७ हजार रुपयाच्या नोटा काढून घेऊन गेले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

----

Web Title: Vandalism from the crowd as the hotel opened for cleaning on a closed day in Barshi; 27 thousand lamps