वैरागमध्ये पोलिसाला तिघांकडून धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:33 IST2021-02-23T04:33:38+5:302021-02-23T04:33:38+5:30
वैराग : येथील शिवाजी चौकात बंदोबस्ताला असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलला शिवीगाळ, धक्काबुक्की करीत हाताला धरून ढकलत सरकारी कामात अडथळा ...

वैरागमध्ये पोलिसाला तिघांकडून धक्काबुक्की
वैराग : येथील शिवाजी चौकात बंदोबस्ताला असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलला शिवीगाळ, धक्काबुक्की करीत हाताला धरून ढकलत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी तिघांविरोधात वैराग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली आहे, तर दोेघे जण फरार आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवार २१ फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलीस काॅन्स्टेबल अमित घाडगे हे बंदोबस्ताला होते. यावेळी कृष्णा अशोक खेंदाड, संदीप उमाप, अक्षय अंधारे (रा. सर्व वैराग) हे येथे सकाळी सात वाजेच्या सुमारास आले. यावेळी तिघांनी मिळून सदरहू पोलिसाची गच्ची धरून शिवीगाळ, धक्काबुक्की करीत ढकलून दिले व सरकारी कामात अडथळा निर्माण केला, अशी फिर्याद तिघांविरोधात वैराग पोलिसांत नोंद करण्यात आली. त्यांच्यापैकी कृष्णा खेंदाड याला अटक करण्यात आली असून, संदीप उमाप व अक्षय अंधारे फरार आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महारुद्र परजने करीत आहेत.