मास्क वापरा अन् कोरोनासह विषाणूजन्य आजारांना रोखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:43 IST2020-12-05T04:43:47+5:302020-12-05T04:43:47+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरण्याविषयी विविध स्तरांतून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. मास्क हा आता दैनंदिन जीवनातील एक भाग बनला ...

मास्क वापरा अन् कोरोनासह विषाणूजन्य आजारांना रोखा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरण्याविषयी विविध स्तरांतून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. मास्क हा आता दैनंदिन जीवनातील एक भाग बनला आहे. घराबाहेर पडताना मास्क वापरण्यास प्राधान्य दिले जाते. त्यामुळे विषाणूजन्य आजारांचा फैलाव टाळण्यासाठी मदत होते.
कोरोनाच्या संकटात अजूनही अनेक जण सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर टाळत आहेत. काही जणांचा मास्क हा हनुवटीवर असतो. तर काही जण खिशातही घेऊन फिरतात. तर काहींना आजाराचे गांभीर्य नाही. मास्कचा योग्य वापर करणे सर्वांच्याच हिताचे आहे. मास्क हा केवळ कोरोनासाठीच नव्हे, तर विषाणूजन्य आजारांसाठी फायदेशीर ठरतो. त्यामुळे कोरोनासह संसर्गजन्य आजारापासून बचावासाठी मास्क वापरण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले.
-----
मास्कने अनेक साथीच्या आजारांना घातला आळा
मास्क वापरल्याने सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. ॲलर्जीचे रुग्णही यापूर्वी अधिक येत होते. मास्कच्या वापराने अशा त्रासालाही दूर ठेवता येणे शक्य झाले आहे. सध्या कोल्ड ॲलर्जी म्हणजे थंडीमुळे काही प्रमाणात रुग्ण येत आहेत. मास्कचा वापर फायदेशीर ठरत असल्याने शासकीय रुग्णालयातील ओपीडीत कमी रुग्ण येत आहेत.
--------
क्षयरोग पसरण्यावर नियंत्रण
इन्फ्लूएंजा, स्वाईन फ्लू, सर्दी, न्यूमोनिया, खोकला, गोवर, क्षयरोग या आजाराच्या रुग्णसंख्येत गेल्या काही महिन्यात घट झाली आहे. मास्क वापरामुळे श्वसनाद्वारे पसरणाऱ्या आजारांना आळा बसण्यास मदत होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
-----
थंडीच्या दिवसात सर्दी,खोकला सारखे आजार श्वासावाटे पसरतात. मास्कचा वापर केल्याने नक्कीच याचा फायदा होतो. घटसर्प सारख्या आजाराने मृत्यूही ओढवू शकतो. या सर्व आजारांना रोखण्यासाठी मास्कचा वापर अधिक चांगला ठरत आहे.
डॉ. राजेश चौगुले, सहायक वैद्यकीय अधीक्षक, शासकीय रुग्णालय
-------