बिनविरोध वाघोलीच्या सरपंचपदासाठी लागली निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:31 IST2021-02-26T04:31:35+5:302021-02-26T04:31:35+5:30

सरपंचपदासाठी ऊर्मिला वाघमारे व जयश्री गावडे या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. ११ सदस्यांपैकी ऊर्मिला वाघमारे यांना ७ ...

Unopposed election for the post of Sarpanch of Wagholi | बिनविरोध वाघोलीच्या सरपंचपदासाठी लागली निवडणूक

बिनविरोध वाघोलीच्या सरपंचपदासाठी लागली निवडणूक

सरपंचपदासाठी ऊर्मिला वाघमारे व जयश्री गावडे या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. ११ सदस्यांपैकी ऊर्मिला वाघमारे यांना ७ मते मिळाली, तर जयश्री गावडे यांना चार मते मिळाली. त्यात ऊर्मिला वाघमारे सरपंच झाल्या. उपसरपंच पदासाठी केवळ तानाजी पवार यांचाच अर्ज आल्याने ते बिनविरोध झाले. निवडणूक अधिकारी म्हणून आर. एस. राजगुरू यांनी काम पाहिले.

यावेळी ग्रामसेवक चंद्रकांत गायकवाड, तलाठी गीतांजली जाधव, पोलीस हेड काॅन्स्टेबल राहुल दोरकर, पोलीस पाटील नितीन उघडे उपस्थित होते.

नूतन सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार माजी सरपंच रामचंद्र पतंगे यांनी केला. यावेळी माजी सरपंच गजेंद्र वाघमारे, नेताजी वाघमारे, नागराज पतंगे, शेखर चोरमुले, सिद्धेश्वर पवार, संजय वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य विकास वाघमारे, नितीन पाटील, भुजंग कोळकर, पवन वाघमारे उपस्थित होते.

फोटो

२५ऊर्मिला वाघमारे

२५तानाजी पवार

Web Title: Unopposed election for the post of Sarpanch of Wagholi