विद्यापीठाच्या सहायक कुलसचिवाने केला महिलेचा विनयभंग
By Admin | Updated: March 22, 2017 21:43 IST2017-03-22T21:43:41+5:302017-03-22T21:43:41+5:30
सोलापूर विद्यापीठात महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी सहायक कुलसचिवाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

विद्यापीठाच्या सहायक कुलसचिवाने केला महिलेचा विनयभंग
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 22 - सोलापूर विद्यापीठात महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी सहायक कुलसचिवाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलापूर, दि. 22 - सोलापूर विद्यापीठात महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी सहायक कुलसचिवाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस.टी.काळे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोप हा सोलापूर विद्यापीठात सहायक कुलसचिव पदावर कार्यरत आहे.
आरोपी हा फिर्यादीच्या घरी आला होता. फिर्यादीने दरवाजा उघडला नाही. त्यानंतर आरोपीने शिपाई मार्फत पीडित महिलेला बोलवुन तिच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले. तसेच अश्लील भाषा वापरून फिर्यादीचा अपमान केला. अशी फिर्याद पीडित महिलेने पोलीस ठाण्यात दिली आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप, सपोनि राउत,फौजदार बोधे आदींनी भेट दिली. या घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप करत आहेत.