शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अनोखा उपक्रम; मतदान करा म्हणून विद्यार्थी लिहिणार आई-बाबांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 20:11 IST

मतदान जनजागृती उपक्रमांतर्गत शाळकरी मुलांना आई-बाबांना पत्र लिहिण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देजिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिका शिक्षण विभागांतर्गत सर्व शाळांना या उपक्रमामध्ये सहभागी करून घेण्यात येणारविद्यार्थ्यांनी आई-बाबा मतदान करा, आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा, असा संदेश पत्रावरती लिहून पालक व कुटुंबीयांची सही घेऊन स्वीप समितीकडे पाठवायचे आहे

सोलापूर : मतदान जनजागृती उपक्रमांतर्गत शाळकरी मुलांना आई-बाबांना पत्र लिहिण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत (स्वीप) टपालाद्वारे जनजागृती हा उपक्रम राबविण्याची कल्पना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भारुड यांनी मांडली.

या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हा मतदार जनजागृती व शिक्षण समिती सदस्यांची बैठक घेण्यात आली. जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिका शिक्षण विभागांतर्गत सर्व शाळांना या उपक्रमामध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी आई-बाबा मतदान करा, आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा, असा संदेश पत्रावरती लिहून पालक व कुटुंबीयांची सही घेऊन स्वीप समितीकडे पाठवायचे आहे. 

तसेच या बैठकीत मतदार जनजागृती अंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी राबविण्यात येणाºया विविध उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. सोलापूर आणि माढा मतदारसंघात मागील लोकसभा निवडणुकीवेळेस सुमारे साठ टक्के मतदान झाले होते. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रम राबवण्यात येत आहे. सध्या घंटागाडीद्वारे मतदान जागृती केली जात आहे.

आता नवमतदारांनी मतदान करावे, यासाठी खास उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या बैठकीला अंकुश चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, देवदत्त गिरी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, मनपा शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी सुधा साळुंखे, शिक्षणाधिकारी अशोक भांजे उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदElectionनिवडणूकVotingमतदानSchoolशाळाStudentविद्यार्थी