शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अनोखा विवाह; मोबाईलवरच मंगलाष्टके वाजवून स्मशानभूमीत बांधल्या रेशीमगाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 17:19 IST

सांगोल्यातील सोहळा; वधू- वरांकडील मोजकेच वऱ्हाडी मंडळींचा सहभाग

ठळक मुद्देस्मशानभूमी हीच आपली कर्मभूमी मानणारा स्मशानजोगी समाज कोणतीही अंधश्रद्धा न बाळगता आजही आपल्या रूढी परंपरेशी बांधील एक रुपये हुंडा न घेता पैशाची कुठलीही उधळपट्टी न करता अत्यंत साध्या पद्धतीने स्मशानभूमीत लग्न करण्याची या समाजाने परंपरा आजही कायम

सांगोला : लॉकडाऊनमुळे सर्वत्र विवाह सोहळ्यावर निर्बंध आले असताना तेही स्मशानभूमीत एखादा विवाह सोहळा मोबाईलवर मंगलाष्टके वाजवून अत्यंत साध्या पद्धतीने होत असेल तर कोणालाही आश्चर्य वाटेल असाच सांगोल्यातील स्मशानभूमीत दुसऱ्यांदा स्मशानजोगी समाजातील विवाह मंगळवारी  झाला.

हादगाव (जि. नांदेड) येथील आई-वडिलांचे छत्र हरपलेला वर मारुती बालाजी घनसरवाडा व मनाढा ता. हदगाव जि.नांदेड येथील आईचे छत्र हरवलेली वधु दुर्गा नथु पवार या दोघांचा विवाह सांगोल्यातील स्मशानभूमीत मंगळवार ३० जून रोजी सकाळी दहाच्या सुमारास शुभ मुहूर्तावर अनावश्यक खर्च टाळून लग्नविधीची औपचारिकता पूर्ण करून मोबाईलवर रेकॉर्ड केलेली मंगलाष्टके वाजवून अवघ्या काही मिनिटात हा विवाह पार पडला. साधारण एक वर्षापूर्वी स्मशानजोगी लक्ष्मण घनसरवाड यांच्या मुलीचा विवाह याच स्मशानभूमीत पार पडला होता. त्यानंतर एक वर्षांनी या स्मशानभूमीत त्यांच्या पुतण्याचा विवाह सोहळा पार पडल्याने हा विवाह सोहळा चर्चेत आला आहे . 

स्मशानभूमी हीच आपली कर्मभूमी मानणारा स्मशानजोगी समाज कोणतीही अंधश्रद्धा न बाळगता आजही आपल्या रूढी परंपरेशी बांधील असल्याचे या विवाह सोहळा दिसून येते. एक रुपये हुंडा न घेता पैशाची कुठलीही उधळपट्टी न करता अत्यंत साध्या पद्धतीने स्मशानभूमीत लग्न करण्याची या समाजाने परंपरा आजही कायम राखली आहे. समाजात देण्याघेण्याची प्रथा नाही, मुला-मुलींच्या पसंतीवरच आजही विवाह ठरवले जातात़ प्रत्येकाचा जन्म कुठे ना कुठे होत असतो, परंतु आमच्या जातीमध्ये जन्म हा स्मशानभूमीत होतो तर मृत्यूही स्मशानभूमीत होतात त्यामुळे घरातील कोणतेही कार्यक्रम स्मशानभूमीत पार पडले जातात. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनच्या कालावधीत सरकारने विवाह सोहळ्याला निर्बंध घातले आहेत. टाळेबंदीच्या काळात कोणताही डामडौल न करता अनावश्यक खर्च टाळून अत्यंत साध्या पद्धतीने स्मशानजोगी समाजातील वर मारुती व वधू दुर्गा यांचा विवाह मंगळवारी स्मशानभूमीत पार पडला. विवाह सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजी पाटील , सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे ,जगदीश मागाडे संतोष सागवाने , हमीद बागवान , वर पिता लक्ष्मण घनसरवाढ वधू- वरांकडील मोजकेच वऱ्हाडी मंडळी उपस्थित होते.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न