छोटे-बडे हुसेनींची अपूर्व भेट
By Admin | Updated: November 5, 2014 15:13 IST2014-11-05T15:13:40+5:302014-11-05T15:13:40+5:30
भारतीय चौकात लहान मुलांसह महिलांनी केलेली गर्दी... डॉल्बीच्या तालावर नाचणारी तरुणाई... आए हुसेना, हुसेना... या हुसेनाचा जयघोष... छोटे आणि बडे हुसेन तलवार पंजांच्या भेटीचा सोहळा सर्वांनी टिपला.

छोटे-बडे हुसेनींची अपूर्व भेट
>सोलापूर : भारतीय चौकात लहान मुलांसह महिलांनी केलेली गर्दी... डॉल्बीच्या तालावर नाचणारी तरुणाई... आए हुसेना, हुसेना... या हुसेनाचा जयघोष... छोटे आणि बडे हुसेन तलवार पंजांच्या भेटीचा सोहळा सर्वांनी टिपला. मोहरमनिमित्त निघालेल्या या मिरवणूक सोहळ्याने वातावरण हर्षाेल्हासित करून सोडले.
मोहरम कमिटीने या उत्सवाची प्रतिवर्षाप्रमाणे बाराइमाम चौकातून तयारी केली होती. एजाज मुजावर यांच्या कुटुंबाकडून इमाम हुसेनसाहेबांच्या कुटुंबाच्या अहले हरम पंजाची ताबूत काढण्यात आली. तसेच तेलंगी पाच्छा पेठ येथून हेमंत सपार परिवाराकडून राष्ट्रीय एकात्मेचे प्रतीक मानल्या जाणार्या पंजाची सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली.
प्रारंभी सकाळी ६ वाजता इमामे कासीम नालबंद परिवाराकडून मिरवणूक निघाली. सकाळी ११ वाजता बडे हुसेनी आणि छोटे हुसेनी यांची जिंदाशाह मदार चौकात भेट झाली. त्यानंतर भारतीय चौकात ही भेट झाली. सायंकाळी ४.३0 वाजता ही दोन्ही पंजांची भेट झाली. यावेळी हवेत कबुतरे सोडून तरुणांनी शांतीचा संदेश दिला. तसेच हिरवा रंग उधळून मोहरमचा आनंद व्यक्त केला गेला.
रात्री १२ वाजता विजापूर वेस येथून हाजीमाही ताबूत-बडे अकबरअली पंजाची भेट झाली. या उत्सवात मोहरम कमिटीचे अध्यक्ष खाजादाऊद नालबंद, जनरल सेकेट्ररी मकबूल मोहोळकर, उपाध्यक्ष हुसेनसाहेब दारुवाले, महिबूब लोकापल्ली, पीरअहमद शेख, शकील मौलवी, गफ्फार गुडमिट्टे, अ.सत्तार सातखेड, हेमंत सपार, इक्बालहुसेन दुर्वेश, इब्राहीम तडकल, सय्यद काझी, अ.रजाक सगरी, अ.मजीद शेख, इक्बाल नदाफ,अत्ताऊल्लाशा मुर्शद, रफियोद्दीन शाब्दी, चाँदसाहेब प्यारे आदी सहभागी झाले होते.
-------------------
थोरला मंगळवेढा तालीम येथील मानाच्या पीर बडा मंगलवेढा सवारीची मिरवणूक मोठय़ा भक्तीभावाने व मंगलमय वातावरणात पार पडली. प्रारंभी कवी बदीऊज्जमा बिराजदार यांनी फातेहखानीचा धार्मिक विधी पूर्ण केला. त्यानंतर संगीतवाद्याच्या निनादात सवारी निघाली. सवारीच्या मिरवणुकीचा समारोप पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांच्या हस्ते करण्यात आला. मोहरमनिमित्त भारतीय चौकात बडे हुसेनी आणि छोटे हुसेनी यांची भेट झाली. या भेटीचा सोहळा पाहण्यासाठी तरुण आणि महिला वर्गाने मोठी गर्दी केली होती. मोहरमच्या दिवशी शहरातून दोनदा मशाल मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. पीर इमाम हुसेन (दुर्वेश पंजा)ची मशालीसह तरुणांनी मंगळवारी पहाटे ४ वाजता मिरवणूक काढली. त्यानंतर सायंक ाळी ७ वाजता तरुणांनी मशाल हाती घेऊन मिरवणूक काढली. पहाटे आणि सायंकाळी काढण्यात आलेल्या या मिरवणुकीने वातावरण मोहरममय करून सोडले. या मशाल दौडमध्ये हजारो तरुणांनी सहभाग नोंदवला. मोहरम कमिटीचे जनरल सेक्रेटरी मकबूल मोहोळकर यांच्या नेतृत्वाखाली ही मिरवणूक क ाढण्यात आली.