विडी कामगारांसाठी युनिफॉर्म गारमेंटस्चा पर्याय, सोलापुरात प्रदर्शन : प्रशिक्षणास जागा देण्याची आयुक्तांची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 03:18 PM2017-12-16T15:18:37+5:302017-12-16T15:22:11+5:30

घरघर लागलेल्या सोलापुरातील विडी उद्योगाला विशेषत: यामध्ये काम करणाºया सुमारे ६० हजार कामगारांसमोर आता  येथे नव्याने विकसित होत असलेल्या युनिफॉर्म (गणवेश) गारमेंट उद्योगातील रोजगाराचा पर्याय ठेवण्यात येणार असून, या कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र सुरू करण्यास जागा देण्याची तयारी महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दर्शविली आहे.

Uniform Recommendations for Weddy Workers, Display in Solapur: Preparation of Commissioner for providing space for training | विडी कामगारांसाठी युनिफॉर्म गारमेंटस्चा पर्याय, सोलापुरात प्रदर्शन : प्रशिक्षणास जागा देण्याची आयुक्तांची तयारी

विडी कामगारांसाठी युनिफॉर्म गारमेंटस्चा पर्याय, सोलापुरात प्रदर्शन : प्रशिक्षणास जागा देण्याची आयुक्तांची तयारी

Next
ठळक मुद्देविडी कामगारांसमोर युनिफॉर्म गारमेंटस् उद्योगात सहभागी होण्याचा मोठा पर्याय विडी कामगारांना आधार देण्यासाठी योजना गारमेंट उद्योग हा सोलापूरसाठी आशेचा किरणविडी कामगारांना पुरेसा रोजगार देणारी ही संकल्पना


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १६ : घरघर लागलेल्या सोलापुरातील विडी उद्योगाला विशेषत: यामध्ये काम करणाºया सुमारे ६० हजार कामगारांसमोर आता  येथे नव्याने विकसित होत असलेल्या युनिफॉर्म (गणवेश) गारमेंट उद्योगातील रोजगाराचा पर्याय ठेवण्यात येणार असून, या कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र सुरू करण्यास जागा देण्याची तयारी महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दर्शविली आहे.
शहराच्या पूर्व भागातील हजारो कुटुंबांना विडी उद्योगाचा मोठा आधार मिळतो. महिला वर्ग या उद्योगात कामगार म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे; पण विड्यांची कमी होत असलेली मागणी आणि आरोग्यासंबंधीचा सावधानतेचा इशारा देणारे चिन्ह सुस्पष्ट आणि मोठ्या आकारात विडी बंडल्स्वर छापण्याचे सरकारने बंधनकारक केल्यामुळे या येथील विडी उद्योगाची मोठी पिछेहाट झाली आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन येथे वालजी युनिफॉर्मस्ने आयोजित केलेल्या एक दिवसाच्या कापड प्रदर्शनाच्या उद्घाटन सत्रात डॉ. ढाकणे यांनी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचे सूतोवाच करून त्यासाठी महापालिकेची जागा देण्याचीही इच्छा प्रकट केली.
या समारंभास बालाजी अमाईन्सचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी, इंडियन मॉडेल स्कूलचे प्रा. ए. डी. जोशी, वालजी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक किशोर कोठारी, बिर्ला सॅलिलोजचे सहाय्यक सरव्यवस्थापक अंकुर थोरात, महावीर टेक्सस्टाईल्सचे प्रकाशचंद डाकलिया, नगरसेवक उपस्थित होते.
राम रेड्डी यांनी यावेळी बोलताना विडी कामगारांसमोर युनिफॉर्म गारमेंटस् उद्योगात सहभागी होण्याचा मोठा पर्याय खुला असल्याचे सूतोवाच केले. युनिफॉर्म गारमेंट उद्योग हल्ली शहरासाठी मोठा कणा होऊ पाहात आहे, असे ते म्हणाले, हा धागा पकडून डॉ ढाकणे यांनी अडचणीत असलेल्या विडी कामगारांना आधार देण्यासाठी आपल्या योजना सांगितल्या. ते म्हणाले, गारमेंट उद्योग हा सोलापूरसाठी आशेचा किरण आहे. सोलापुरात मोठ्या संख्येने गणवेश तयार केले जातात. त्याचे देशभर वितरण होते. गणवेशाची शिलाई ही मशीन्सवर केली जाते. यासाठी फारसे कुशल कामगार लागत नाहीत. त्यामुळे विडी उद्योगातील महिला यातून रोजगार निर्मिती करू शकतात.  विडी कामगारांना पुरेसा रोजगार देणारी ही संकल्पना राबविण्यासाठी भावनिक आवाहन केले तर अनेकजण सहकार्यासाठी पुढे येतील, असा विश्वास डॉ. ढाकणे यांनी व्यक्त केला.
यावेळी कोठारी, थोरात यांची भाषणे झाली. हे प्रदर्शन पाहण्यासाठी सोलापुरात गारमेंटस् उद्योगातील मान्यवर उपस्थित होते.
------------------
लवकरच बैठक
सोलापुरात युनिफॉर्म गारमेंट उद्योगाला चालना देण्यासाठी आणि यामध्ये विडी कामगार महिलांना समाविष्ट करण्याच्या उद्देशाने लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल. शिवाय प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासंदर्भातही यामध्ये चर्चा करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी यावेळी सांगितले.
-----------------
प्रदर्शनात ७००० डिझाईन्स
जुनपासून सुरू होणाºया गणवेशाच्या हंगामासाठी पूर्वनियोजन करणे सोयीचे व्हावे, यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन केले असून, वालजी युनिफॉमर्स, बिर्ला सॅलिलोजने हे प्रदर्शन येथील महावीर टेक्स्टाईलच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले आहे. या प्रदर्शनात सोलापुरात उद्योजकांसाठी ७००० डिझाईन्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती ‘महावीर’चे प्रकाशचंद डाकलिया यांनी दिली.

Web Title: Uniform Recommendations for Weddy Workers, Display in Solapur: Preparation of Commissioner for providing space for training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.