अज्ञात चोरट्यांनी ९२ हजारांचा ऐवज पळविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:25 IST2021-09-23T04:25:25+5:302021-09-23T04:25:25+5:30
सांगोला-सैनिकनगर येथील वनिता पांडुरंग इंगोले या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात सांगोलांतर्गत महुद बीट येथे वनरक्षक म्हणून नोकरीस आहेत. त्या रमेश ...

अज्ञात चोरट्यांनी ९२ हजारांचा ऐवज पळविला
सांगोला-सैनिकनगर येथील वनिता पांडुरंग इंगोले या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात सांगोलांतर्गत महुद बीट येथे वनरक्षक म्हणून नोकरीस आहेत. त्या रमेश केदार यांच्या बंगल्यात भाड्याने राहतात. पती व सासू १५ दिवसांपूर्वी गणपती उत्सवासाठी सोलापूर येथे गेल्या होत्या. दरम्यान, १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७च्या सुमारास त्या घराचा दरवाजा गेट लॉक करून माहेरी कार्यक्रमासाठी गेल्या. मंगळवारी सकाळी ८च्या सुमारास परत घरी आल्या असता, दरवाज्याचे कुलूप तुटून खाली पडलेले दिसले. त्यांनी आत जाऊन पाहिले असता, ड्राॅव्हरमध्ये ठेवलेल्या सुमारे ५२ हजारांच्या लहान मुला व मुलीच्या सोन्याच्या अंगठ्या, २० हजारांचे कानातील गुंड साखळीसह, २० हजार रुपयांचे सोन्याचे लॉकेट गायब असल्याचे दिसून आले. याबाबत वनिता इंगोले यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली आहे.