शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबराव देशमुख सवलत योजनेतून सोलापूर जिल्ह्यातील ४० हजार शेतकºयांना व्याजापोटी मिळाले १२ कोटी रूपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 13:18 IST

सोलापूर : जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या मुदतीत जिल्ह्यातील विविध बँकांच्या ४२१ शाखांनी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी प्रस्ताव सादर केले. ...

ठळक मुद्देबँकांच्या ४२१ शाखांनी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी प्रस्ताव सादर केलेजिल्हा बँकेच्या मागणीनुसार डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योेजनेची ७ कोटी ३३ लाख ४५ हजार २८ इतकी रक्कम बँकेला दिली

सोलापूर : जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या मुदतीत जिल्ह्यातील विविध बँकांच्या ४२१ शाखांनी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी प्रस्ताव सादर केले. या प्रस्तावानुसार जिल्ह्यातील ४० हजार ३८१ शेतकºयांना व्याजापोटी ११ कोटी ८८ लाख रुपये मिळाले आहेत. मात्र ९८ शाखांचे प्रस्ताव आले नाहीत.

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या अनुदान मागणीसाठी राष्टÑीयीकृत बँका प्रस्तावच देत नव्हत्या. जिल्हा मध्यवर्ती बँकेने मात्र सर्वच २१२ शाखांचे प्रस्ताव अनुदानासाठी सादर केले होते. जिल्हा बँकेच्या मागणीनुसार डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योेजनेची ७ कोटी ३३ लाख ४५ हजार २८ इतकी रक्कम बँकेला दिली आहे. जिल्हा बँकेच्या प्रस्तावानुसार व्याजाची रक्कम शेतकºयांना मिळाली असताना राष्टÑीय बँका मात्र दखल घेत नव्हत्या.

जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी याबाबत बँकांना वारंवार पत्र देऊन शिवाय तोंडी सांगितल्यानंतरही राष्टÑीयीकृत बँका जुमानत नव्हत्या. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी व्याजाची रक्कम मागणी प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती. या मुदतीत राष्टÑीय बँकांच्या ३३३ पैकी २०९ शाखांनी अनुदान मागणी प्रस्ताव सादर केले होते. त्यानुसार राष्टÑीय बँकांच्या कर्जदार शेतकºयांसाठी ४ कोटी ५५ लाख इतकी रक्कम जिल्हा उपनिबंधकांनी दिली आहे. एक व तीन लाख रुपयांचे कर्ज वेळेत भरणाºया ४० हजार ३८१ शेतकºयांना व्याजापोटी डॉ. पंजाबराव देशमुख योजनेतून ११ कोटी ८८ लाख इतकी रक्कम देण्यात आली आहे. 

आजही राष्टÑीय बँकेच्या १२४ शाखांचे प्रस्ताव अनुदानासाठी आलेले नाहीत, त्यामध्ये २६ शाखा निरंक आहेत. शेतीसाठी कर्ज वाटप केलेल्या ९८ शाखांचे प्रस्ताव अद्याप आले नाहीत.

राष्टÑीयच्या २६ शाखा निरंक च्राष्टÑीय बँकांच्या २६ शाखांचे प्रस्ताव निरंक आहेत. स्टेट बँक आॅफ इंडियाच्या २१, आयसीआयसीआयच्या २९, बँक आॅफ बडोदाच्या १४, सेंट्रल बँकेच्या ८ व बँक आॅफ महाराष्टÑच्या चार शाखांचे प्रस्ताव अनुदानासाठी आले नाहीत. या प्रमुख बँकांव्यतिरिक्त अन्य कॅनरा, अ‍ॅक्सिस, एचडीएफसीसह १२ बँकांच्या शाखांनी व्याज अनुदान मागणी केलेली नाही. 

एकही शेतकरी व्याज अनुदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही घेणार असल्याने बँकांचे प्रस्ताव सध्याही घेतले जात आहेत. बँकांनी व्याजाची रक्कम मागणी प्रस्ताव सादर करून शेतकºयांना अनुदान मिळवून द्यावे.- अविनाश देशमुखजिल्हा उपनिबंधक, सोलापूर 

टॅग्स :SolapurसोलापूरBanking Sectorबँकिंग क्षेत्रFarmerशेतकरीagricultureशेतीgovernment schemeसरकारी योजना