काका.. वडाळा गावाची निवडणूक बिनविरोध करा की!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:19 IST2021-01-04T04:19:44+5:302021-01-04T04:19:44+5:30

उत्तर सोलापूर : काका आपण जिल्हाध्यक्ष आहात. आपली वडाळा ग्रामपंचायत बिनविरोध करा अन् राज्यात एक माॅडेल ग्रामपंचायत म्हणून विकसित ...

Uncle .. make the election of Wadala village unopposed! | काका.. वडाळा गावाची निवडणूक बिनविरोध करा की!

काका.. वडाळा गावाची निवडणूक बिनविरोध करा की!

उत्तर सोलापूर : काका आपण जिल्हाध्यक्ष आहात. आपली वडाळा ग्रामपंचायत बिनविरोध करा अन् राज्यात एक माॅडेल ग्रामपंचायत म्हणून विकसित करा, अशी विनंती केली आमदार यशवंत माने यांनी. मतदारसंघातील काही गावे विकासात माॅडेल करायची आहेत, असेही माने म्हणाले.

आमदार माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे हे बीबीदारफळ येथे आले असता त्यांची औपचारिक चर्चा सुरू असताना आमदार माने यांनी काका तुमचे वडाळा गाव बिनविरोध करा, असे म्हणाले. तुम्ही तर सहजच सर्व सदस्य निवडून आणू शकता.. मात्र एखादी जागा विरोधकांना द्या व गाव एकसंध करा, अशी सूचना आमदार माने यांनी केली. काकांनीही सकारात्मक प्रतिसाद देत चर्चा करू असे म्हणाले.

यावेळी बीबीदारफळच्या शेतकऱ्यांनी रस्ते व विजेचा प्रश्न मांडला. निधी तर देतोच मग ग्रामपंचायत बिनविरोध का करीत नाही, असा प्रश्न आमदार माने यांनी उपस्थित केला. तेव्हा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी आम्ही तयार असल्याचे सांगितले.

Web Title: Uncle .. make the election of Wadala village unopposed!