शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडू, नांदेड अन् कोल्हापूरच्या ऊसतोड मजूरांना उळेकरांचा लळा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 10:50 IST

माणूसकीचे दर्शन; खाण्यापिण्यासह राहण्याचीही सोय, ग्रामस्थांचा पुढाकार

ठळक मुद्देउळे ग्रामपंचायतीचा सामाजिक उपक्रमग्रामस्थांनी अन्नधान्यासाठी केली मोठी मदतग्रामस्थांच्या मदतीने ऊसतोड कामगारांना अन्नदान

सोलापूर/उळे : सध्याच्या कोविड १९ कोरोना विषाणूच्या प्रादूभार्वाच्या कठीण परिस्तिथीमध्ये जे ऊसतोड मजूर कोल्हापूर येथून नांदेड येथे चालत निघाले होते़ याशिवाय जे कामगार उस्मानाबाद येथून तामिळनाडूकडे चालत चालले होते. त्या स्त्री, पुरूष, लहान मुलांची खाण्यापिण्यासह राहण्याची उत्तम सोय उळे ग्रामस्थांनी केली़ घरच्याप्रमाणेच इथेही सोय झाल्याने मागील महिन्यांभरापासून या ऊसतोड मजूरांना आता उळेकरांचा चांगलाच लळा लागल्याचे दिसून येत आहे. 

सध्या कोरोना या विषाणूजन्य आजाराने थैमान घातलेले आहे़ आपल्या देशात लॉकडाऊन जाहीर झाले आणि जो जिथे आहे तिथेच थांबला. राज्यांच्या सीमा, जिल्ह्यांच्या सीमा, गावाच्या सीमा बंद झाल्या़ वाहने बंद, रेल्वे बंद, एस. टी.ही बंद झाली़ कारखाने, व्यवसाय, व्यापारही बंद झाले. त्यामुळे हातावरील पोट असणारी मजूर, कामगार मंडळी हतबल झाली. अनेक लोकांचे लोंढे आपापल्या गावाकडे जाण्यासाठी चालत निघाले. या विषाणूची घातकता फार असल्याने शासनाने अशा चालत जाणाºया लोकांना थांबवून त्या त्या गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सोय करण्याचे निर्देश दिले, त्याच पार्श्वभूमीवर उळे गावचे सरपंच सुरेश डांगे, उपसरपंच अप्पासाहेब धनके, शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम शिंदे, मुख्याध्यापक बशीर तांबोळी, कोरोना बाबत प्रशिक्षण झालेले शिक्षक महादेव हेडे, पोलीस पाटील पांडुरंग कुंभार, ग्रामसेवक पठाण, ग्रामपंचायत कर्मचारी पिंटू कुंभार तसेच ग्रामस्थ नितीन कुंभार, अविनाश मुळे यांनी गटविकास अधिकारी व तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली नियोजन करून शाळेच्या सर्व खोल्या रिकाम्या करून एक खोलीत ४ याप्रमाणे नियोजन करून २८ स्त्रिया, पुरुष व लहान मुले यांची सोय करण्यात आली.----------------परजिल्ह्यातील मजुरांची

दररोज होतेय आरोग्य तपासणी...

भोजनाची सोय होई पर्यंत कांही दिवस पुरेल इतका अन्नसाठा, गॅस,किचनरूम सह ताब्यात देण्यात आले आहे़ स्वच्छ शौचालय, पाण्याची कमतरता भासू नये म्हणून बोअर चालू करण्यासाठी मोटरची (रूम) चावी तसेच गॅस अचानक संपला तर अडचण येऊ नये म्हणून जळण ही दिलेले आहे़ पोषण आहार मटेरियल शिवाय सर्व जीवनावश्यक वस्तू, पिण्याचे पाणी जार, ज्वारी, गहू ,पालेभाज्या, स्वयंपाकासाठी लागणारे मसाले, दूध, तेल ,साबण, डेटॉल, फिनेल आणि आरोग्याच्या संरक्षणासाठी औषधोपचाराची सोय ग्रामपंचायत उळे यांनी केलेली आहे. शिवाय गावातील दानशूर व्यक्ती ही मदत करत आहेत. सोलापूर बाजार समितीनेही मोलाची मदत केलेली आहे. दररोज या मजुरांची आरोग्य तपासणी डॉक्टर मार्फत होत आहे.---------------

कोरोना या विषाणूचा गावातील कोणत्याही व्यक्तीला संसर्ग होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीने काळजी घेतली आहे़ आशा वर्कर यांच्यामार्फत गावातील नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे़ यासाठी उपजिल्हाधिकारी दिपक शिंदे, तहसिलदार अमोल कुंभार, गटविकास अधिकारी, आरोग्याधिकारी, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांच्यासह आदी ग्रामस्थ वेळोवेळी सहकार्य करीत आहेत. 

- सुरेश डांगे,सरपंच, उळे ग्रामपंचायत

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस