शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

युक्रेनच्या युद्धामुळे साेयाबीनचा वाढला भाव; गोडेतेलाचे आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 17:58 IST

गोडेतेलाचा परिणाम : भावात चढउतार होत असल्याने शेतकरी सावध

साेलापूर : युक्रेन व रशियातील युद्धामुळे पामतेलाच्या आयातीवर परिणाम झाल्याने सोयाबीनला मागणी वाढली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी सोयाबीनच्या दरात प्रति क्विंटलला दोनशे रुपयांनी वाढ झाली.

दिवाळीनंतर सोयाबीनचे भाव पडले. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारात आणला नाही. गेल्या महिन्यात सोयाबीनचा भाव साडेपाच हजारांवरून सहा हजारापर्यंत गेला होता. तरीही भाव वाढेल या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारात आणलाच नाही. अशात युक्रेन व रशियात युद्ध सुरू झाले. यामुळे पामतेलाच्या आयातीवर परिणाम झाल्याने गोडेतेलाचे भाव प्रति किलोला दहा रुपयाने वाढले आहेत. गोडेतेलाचे भाव आणखी भडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचा सोयाबीन खरेदीकडे कल वाढला आहे. यामुळे बाजारात सतत सोयाबीनचे दर वाढत आहेत. बुधवारी साडेसात ते ७ हजार ८०० सोयाबीनला भाव मिळाला. दरात दोनशे रुपयाने वाढ झाल्याचे अडते अंबारे यांनी सांगितले.

तुरीच्या भावातही प्रति क्विंटल ५० रुपयाने वाढ झाली. हरभरा, मूग, उडीद, तिळाचे भाव मात्र स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. शेती मालाचे प्रति क्विंटल दर पुढीलप्रमाणे. तूर : पिंक : ५८०० ते ६४११, हरभरा नवीन : ४६५० ते ४८७५, मूग : ६००० ते ६५००, उडीद : ५५०० ते ६०००, तीळ : ७५०० ते १००००.

भाव अजून वाढण्याची आशा

युक्रेन-रशिया युद्ध फार काळ चालले तर गोडेतेलाचे भाव भडकणार आहेत. त्यामुळे सोयाबीनचे मार्केट आणखी वाढेल असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे व्यापारी चढ्या दराने सोयाबीनची मागणी करीत आहेत. भावात चढ उतार होताना दिसत आहे.

असे होते सोयाबीनचे दर

  • २१ डिसेंबर : ५७४०
  • २७ डिसेंबर : ६२००
  • ३१ डिसेंबर : ६२१५
  • १० जानेवारी : ६१५०
  • २५ जानेवारी : ५९०५
  • १० फेब्रुवारी : ६२४०
  • २१ फेब्रुवारी : ६४३५
  • २८ फेब्रुवारी : ७२००
  • २ मार्च : ७८००
टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाFarmerशेतकरी