शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

राजकीय रेटा नसल्यामुळे उजनीचा तिसरा आराखडा अडकला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 18:36 IST

खर्च पोहोचला २६०० कोटींवर; वर्षभरापासून सुरू आहे दुरुस्तीचा खेळ

ठळक मुद्दे देगाव(उत्तर तालुका) जोडकालव्याच्या कामासाठी ४५० कोटी रुपये खर्च अपेक्षीतशासनाने निधी उपलब्ध केल्यास पाच वर्षांत कामे करण्याचे नियोजन दोन वर्षापासून (येत्या मार्चपर्यंत) उजनीच्या कामावर नव्याने एक रुपयाही खर्च झालेला नाही

सोलापूर: उजनी जलवाटपासाठीची अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि मंगळवेढ्यातील कामे अद्याप पूर्ण व्हायची आहेत. या कामांसाठी तिसरा सुधारित आरखडा मंजूर होणे गरजेचे असून, या तालुक्यातील नेत्यांचा राजकीय रेटा नसल्यामुळेच २६०० कोटी रूपयांचा हा आरखडा मंजुरीविना अडकून राहिला असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

 उजनी धरणावरील उर्वरित कामाला तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठीचा प्रस्ताव राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडे मंजुरीसाठी अडकला आहे. १९६४ मध्ये केवळ ४० कोटीचा असलेला हा प्रकल्प २०१८ मध्ये ५४ वर्षांनंतर २६०० कोटीवर गेला आहे.सोलापूर,पुणे व अहमदनगर जिल्ह्यासाठी उपयुक्त ठरणाºया उजनी धरणाची उर्वतिर कामे करण्यासाठी प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता आहे.

सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्यानेच सध्या कोणतेही काम करता येत नाही व त्यासाठी शासन निधीही देत नाही.  माढा तालुक्यातील उजनी धरणाच्या कामाला तत्कालीन केंद्रीय संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ७ मार्च १९६६ रोजी सुरुवात केली होती. उजनीचे १९६४ मधील  मूळ अंदाजपत्रक ४० कोटी रुपयाचे होते. दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता १९७६ मध्ये मिळाली होती त्यानुसार उजनी धरणाच्या कामाचा खर्च ४०० कोटीवर गेला. 

१२ वर्षात उजनी धरणावरील कामाचा खर्च ३६० कोटीने वाढला होता. द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता २००२ मध्ये मिळाली होती त्यावेळी १४०५ कोटीचा खर्च अपेक्षीत होता. हा संपूर्ण खर्च झाल्यानेच आता उर्वरित कामासाठी तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव तयार केला आहे. 

 तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव मागील दोन वर्षापासून तयार करणे व त्यात सुधारणा करण्यात येत आहे.  वर्षभरापासून राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडे मंजुरीसाठी अडकला आहे. सुधारित मान्यता मिळाल्यानंतर २० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून त्यामध्ये देगाव जोडकालव्याखालील १५ हजार ५९९ हेक्टरचा समावेश आहे. सल्लागार समितीची ४० ते ४५दिवसानंतर बैठक होते, उजनी सुधारित प्रशासकीय मान्यतेचा विषय चार वेळा पुढे आला असल्याचे सांगण्यात आले. 

ही आहेत प्रलंबित कामे- उजनी’च्या तृतीय सुधारित आराखड्याला मान्यता मिळाली नसल्याने मंगळवेढा तालुक्यातील बोराळे शाखा कालव्याच्या कामासाठी साधारण २५ कोटी, भूसंपादनाचे १०० कोटी रुपये.- देगाव(उत्तर तालुका) जोडकालव्याच्या कामासाठी ४५० कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे.- तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर व शासनाने निधी उपलब्ध केल्यास पाच वर्षांत कामे करण्याचे नियोजन आहे. - प्रशासकीय मान्यता नसल्याने दोन वर्षापासून (येत्या मार्चपर्यंत) उजनीच्या कामावर नव्याने एक रुपयाही खर्च झालेला नाही. सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली व येत्या अर्थसंकल्पात तरतूद झाली तरच उजनीच्या उर्वरित कामाला पैसे मिळणार आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणWaterपाणीGovernmentसरकार