शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

उजनी धरणाचे पाणी उपसून हिप्परगा तलावात सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 15:04 IST

इतिहासात पहिल्यांदा नियोजन; पाणीपुरवठा विभागाकडून यंत्रणा उभारणीचा प्रस्ताव

ठळक मुद्देउजनी धरणातून भीमा नदीसह कालव्यांना पाणी सोडण्यात येत आहेकारंबा कॅनॉलचा टेलएंड हिप्परगा तलावाजवळ आहेमहापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पंपिंग करून तलावातील इंटकवेलपर्यंत सोडण्याचा प्रस्ताव तयार केला

राकेश कदम 

सोलापूर : उजनीच्या डाव्या कालव्यातून कारंबा शाखेला सोडलेले पाणी पंपिंग करून हिप्परगा तलावात घेण्याचे नियोजन महापालिकेने सुरू केले आहे. यासाठी प्रशासनाने पंपिंग मशीन, चर खोदाई आणि ट्रान्स्फॉर्मर खरेदीचा प्रस्ताव तयार केला आहे. मनपा आयुक्त दीपक तावरे यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. हिप्परगा तलावात पाणी आल्यास शहराला दोन किंवा तीन दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. 

उजनी धरणातून भीमा नदीसह कालव्यांना पाणी सोडण्यात येत आहे. डाव्या कालव्यातून सोडलेले पाणी मोहोळ तालुक्यातील सौंदणे येथे पोहोचल्यानंतर बेगमपूर आणि कारंबा शाखा कॅनॉलला सोडले जाते. कारंबा कॅनॉलचा टेलएंड हिप्परगा तलावाजवळ आहे. मात्र येथून थेट तलावात पाणी येत नाही. पंपिंग करून तलावात घ्यावे लागते. पावसाळी अधिवेशनात शहर पाणीपुरवठ्याच्या मुद्यावरून गदारोळ झाला होता. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बैठक घेतली होती. 

या बैठकीत मनपा आणि जलसंपदा विभागातील अधिकाºयांनी उजनीचे पाणी हिप्परगा तलावात घेता येईल, असा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावावर आता काम सुरू झाले आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पंपिंग करून तलावातील इंटकवेलपर्यंत सोडण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. मनपा आयुक्त दीपक तावरे यांच्याकडे या विषयावर चर्चा होणार आहे. सध्या पूरस्थिती आहे. उजनीतील बहुतांश पाणी भीमा नदीत वाहून जाणार आहे. हे पाणी हिप्परगा तलावात घेतल्यास शहराचा भविष्यातील पाणीपुरवठ्याचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहेत. 

कॅनॉलपासून इंटकवेलपर्यंत चर खोदणार- कॅनॉलमधून पाणी उपसा केल्यानंतर ते इंटकवेलपर्यंत यावे, यासाठी एक चर खोदण्यात येईल. इंटकवेलजवळ गाळ आहे. गाळ काढणे आणि चर खोदण्यासाठी १८ लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाने सलग २० दिवस ८० एमएलडी पाणी द्यावे, अशी मनपाची मागणी आहे. नवीन पंपिंग मशीन खरेदी करणे व इतर कामांसाठी १९ लाख, तलावात चर खोदण्यासाठी १८ लाख, ट्रान्स्फॉर्मर यार्ड व ट्रान्स्फॉर्मर खरेदी ९ लाख रुपये असा ४६ लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. पंपिंगसाठी १० अश्वशक्तीचे ३० पंप, ३० अश्वशक्तीचे चार पंप घेण्यात येणार आहेत. मनपा आयुक्तांच्या अधिकारात या कामाला तातडीने मंजुरी मिळावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

मनपा पदाधिकाºयांचे दुर्लक्ष - कारंबा शाखा कॅनॉलचे पाणी हिप्परगा तलावात घेण्यासाठी २०१५ मध्ये प्रयत्न झाले होते. मुंबईतील बैठकीनंतर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सोलापुरात बैठक घेऊन कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. जुलै महिन्यात यावर काम झाले असते तर आता डाव्या कालव्याचे पाणी हिप्परगा तलावात आले असते. सत्ताधारी भाजप पदाधिकाºयांनी यासाठी पाठपुरावा केला नाही. आता महापालिकेने तयारी केली असली तरी वीज वितरण विभागाची भूमिका महत्त्वाची आहे. वीज वितरणच्या अधिकाºयांनी लवकर मंजुरी दिली तरच हिप्परगा तलावात पाणी येईल, असे मत पाणीपुरवठा विभागातील अधिकाºयांनी व्यक्त केले. 

दहा वर्षांपासून तलाव कोरडाच- उजनी ते सोलापूर जलवाहिनी, औज बंधारा आणि हिप्परगा तलाव हे शहर पाणीपुरवठ्याचे मुख्य स्रोत आहेत. परंतु, गेल्या दहा वर्षांपासून हिप्परगा तलावात फारसे पाणी नसते. डिसेंबरनंतर तलाव कोरडाच पडतो. मनपा पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार हिप्परगा तलावाची क्षमता दोन टीएमसी आहे. तलाव भरल्यास शहराला दीड वर्षे पुरेल इतके पाणी मिळेल. २००८ पासून तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला नाही. यंदा पावसाला सुरुवात होऊनही तलाव कोरडाच आहे. हिप्परगा तलावातून भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्रात पाणी घेतले जाते. 

उजनी कॅनॉलचे पाणी हिप्परगा तलावात घेण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत. लवकरात लवकर हा प्रस्ताव मंजूर करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. - दीपक तावरे, आयुक्त, मनपा. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाUjine Damउजनी धरणwater transportजलवाहतूक