....उजनीचे अर्धशतक !
By Appasaheb.dilip.patil | Updated: August 1, 2017 18:02 IST2017-08-01T18:02:22+5:302017-08-01T18:02:30+5:30
बेंबळे दि १ : पावसाळा निम्मा संपला तरीही जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस नाही. पण वरच्या धरणातून पाण्याचा विसर्ग आल्याने उजनीने ४९.५५ टक्क्यांपर्यंत म्हणजे अर्धशतक गाठले आहे.

....उजनीचे अर्धशतक !
आॅनलाइन लोकमत सोलापूर
बेंबळे दि १ : पावसाळा निम्मा संपला तरीही जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस नाही. पण वरच्या धरणातून पाण्याचा विसर्ग आल्याने उजनीने ४९.५५ टक्क्यांपर्यंत म्हणजे अर्धशतक गाठले आहे.
पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला. पण आता उजनी निम्म्यावर आले आहे. दौंड येथून उजनी धरणात येणारा विसर्ग घटला आहे. यामुळे धरणामध्ये होणारी वाढ कमी-कमी होत चालली आहे; मात्र येणाºया विसर्गाचा अंदाज घेता आज एक आॅगस्टला हे धरण ५0 टक्के होत आहे. गेल्यावर्षी उजनी धरण ३१ जुलै रोजी वजा २६.९१ टक्के होते. यंदा गेल्या वर्षापेक्षा ७६ टक्के पाणी जास्त आहे.
आतापर्यंत उजनी धरणात दोन महिन्यात ८१ टक्के पाणीसाठा झाला आहे.
मायनस ३१.५३ व प्लस ५0 टक्के म्हणजेच धरणात ८१ टक्के पाणीसाठा झाला आहे.