सोलापूरच्या दोन तरुणांना उसाच्या कांडक्यानं जमावाकडून तामलवाडीजवळ बेदम मारहाण
By विलास जळकोटकर | Updated: October 28, 2023 15:17 IST2023-10-28T15:17:43+5:302023-10-28T15:17:49+5:30
या मारहाणीत डोळ्याच्या बाजूला व कपाळाला मार लागल्याने अशोक जखमी झाला तर आदित्यच्या डोक्याला जखम झाली

सोलापूरच्या दोन तरुणांना उसाच्या कांडक्यानं जमावाकडून तामलवाडीजवळ बेदम मारहाण
सोलापूर : हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलेल्या हत्तूर (ता.द. सोलापूर) येथील दोघा तरुणांना जमावाकडून उसाच्या कांडक्याने बेदम मारहाण करुन जखमी केले. शुक्रवारी रात्री उशिरा तामलवाडी टोलनाक्याजवळील हॉटेलमध्ये ही घटना घडली. अशोक गेनसिद्ध रणधिरे (वय- २२) व अदित्य राजू कांबळे (वय २३) अशी जखमी तरुणांची नावे आहेत.
यातील जखमी तरुण अशोक व अदित्य हे दोघे तामलवाडीजवळील १०० मीटर अंतरावर असलेल्या हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलेले होते. अचानक तेथे सात ते आठ जणांचा जमाव आला.त्यांच्या हातात उसाच्या कांड्या होत्या. त्या जमावातील लोकांनी अशोक आणि आदित्य यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत डोळ्याच्या बाजूला व कपाळाला मार लागल्याने अशोक जखमी झाला तर आदित्यच्या डोक्याला जखम झाली असून नातेवाईक प्रशांत रणधिरे यांनी उपचारास दाखल केल्याची नोंद सिव्हील पोलीस चौकीत झाली आहे.