सोलापुरात सर्च ऑपरेशनमध्ये पकडले दोन वर्षांपासून फरार गुन्हेगार; सातजणांना अटक
By विलास जळकोटकर | Updated: August 16, 2023 18:38 IST2023-08-16T18:18:45+5:302023-08-16T18:38:49+5:30
पोलिसांना गुंगारा देणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी एमआयडीसी पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन केले.

सोलापुरात सर्च ऑपरेशनमध्ये पकडले दोन वर्षांपासून फरार गुन्हेगार; सातजणांना अटक
सोलापूर - एमआयडीसी पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन केले. यात दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपींसह सातजणांना अटक करण्यात आली.
हिदायत्तुल्ला हारुनखान पठाण, रेहमान सिराज पटेल, जुबेर फिरोज पठाण, ओसामा उर्फ जबीउल्ला अतालउल्लाखान पठाण, व्यंकटेश उर्फ बाशा तिप्पण्णा जिंदे, तौसिफ उर्फ शाहरूख मुर्तूज शेख व रोहित रेवण क्षीरसागर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. स्वातंत्र्यदिनी ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना गुंगारा देणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी एमआयडीसी पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन केले. त्यामध्ये फरार असलेले आणि विविध गुन्ह्यात हवे असलेले आरोपी हाती लागले.