विनानंबर ट्रॅकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:32 IST2021-02-26T04:32:40+5:302021-02-26T04:32:40+5:30

विनानंबरच्या ट्रॅक्टरची समोरून धडक, दुचाकीस्वार जागीच ठार बार्शी : बार्शी तालुक्यातील मालवंडी गावाकडे दुचाकीवरून येत असताना समोरून ...

Two-wheeler killed in collision with unnumbered tracker | विनानंबर ट्रॅकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

विनानंबर ट्रॅकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

विनानंबरच्या ट्रॅक्टरची समोरून धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

बार्शी : बार्शी तालुक्यातील मालवंडी गावाकडे दुचाकीवरून येत असताना समोरून येणाऱ्या विनानंबरच्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने सागर भीमराव गायकवाड (वय २३, रा. मालवंडी) हा गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. ही घटना गुरुवारी सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान मालवंडीजवळ घडली. अपघात होताच चालक जागेवरच ट्रॅक्टर सोडून पळून गेला.

याबाबत मयताचे नातलग धनाजी किसन मोरे (वय २६ रा. मालवंडी) यांनी तालुका पोलिसांत फिर्याद दिल्याने गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, यातील मयत व फिर्यादी हे दोघे दोन वेगवेगळ्या स्वतःच्या दुचाकीवर मालवंडी गावाजवळ काटेवस्तीवर राहत असलेल्या बहिणीस भेटण्यासाठी गेले होते. मयत हा त्याच्या (क्र. एम.एच. १३ एवाय. ०४७६) दुचाकीवरुन येत होता. त्यावेळी विनानंबरचा ट्रक समोरून आला आणि त्याने सागर गरड याच्या दुचाकीस धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्या छातीस जबर मार लागल्याने जागीच बेशुद्ध पडला. अपघात होताच चालक जागीच ट्रॅक्टर सोडून पळून गेला.

याचवेळी गावातील सदाशिव थोरात हे त्यांच्या कारने सोलापूरकडे जात होते. त्यांनी जखमीस बार्शीला दवाखान्यात आणले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वी तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अधिक तपास तालुका पोलीस रियाज शेख हे करत आहेत.

फोटो मिळताच पाठवितो

Web Title: Two-wheeler killed in collision with unnumbered tracker