ऊसाच्या ट्राॅलीस धडकून दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:21 IST2020-12-22T04:21:29+5:302020-12-22T04:21:29+5:30

ही घटना उस्मानाबाद-बार्शी रस्त्यावर चिखर्डे (ता.बार्शी) येथील किंगकाॅर्नर हाॅटेलजवळ घडली. ट्रॅक्टरचालकावर पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. दशरथ त्रिंबक ...

Two-wheeler hit by sugarcane trolley | ऊसाच्या ट्राॅलीस धडकून दुचाकीस्वार ठार

ऊसाच्या ट्राॅलीस धडकून दुचाकीस्वार ठार

ही घटना उस्मानाबाद-बार्शी रस्त्यावर चिखर्डे (ता.बार्शी) येथील किंगकाॅर्नर हाॅटेलजवळ घडली. ट्रॅक्टरचालकावर पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.

दशरथ त्रिंबक शिंदे (वय ४९ रा. नारी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत मयताचा पुतण्या लखन वैजीनाथ शिंदे (वय २९ रा.नारी)यांनी दिलेल्या या फिर्यादीत म्हटले की, शेतामध्ये फवारणीची औषधे आणण्यासाठी दशरथ त्रिंबक शिंदे हे नारीहून बार्शीकडे मोटारसायकलवरून रात्री सात वाजताच्या दरम्यान जात होते. चिखर्डे गावच्या पुढे किंग काॅर्नर हाॅटेलजवळ आले असता,रस्त्याच्या मध्यभागी उभी असलेला उसाचा ट्रॅक्टर (नं. एम.एच.२५ ए.एल.९७१४ तर ट्राॅली नं. एम.एच.२५ ए.एल.६६६३) ट्राॅलीस पाठीमागून धडकले. रस्त्याच्या मध्यभागी ट्रॅक्टर व ट्राॅली उभी असतानादेखील चालक रोहन अनिल कोंढारे (रा.चिखर्डे) याने ट्राॅलीस कोणत्याही प्रकारचे रिपलेक्टर लावलेले नव्हते. ट्राॅली उभी असल्याबाबतचे कोणतेही पार्किंग लावलेले नव्हते. या धडकेत दशरथ शिंदे यांच्या डोक्यास जबर मार लागल्याने यांना तत्काळ बार्शी येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सोलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करून उपचार चालू असताना मृत्यू झाला.

याबाबत ट्रॅक्टरचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

Web Title: Two-wheeler hit by sugarcane trolley