चोरीची म्हैस विकत घेतल्याप्रकरणी दोघा व्यापाऱ्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:27 IST2021-09-09T04:27:39+5:302021-09-09T04:27:39+5:30

तामदर्डी शिवारातून फिर्यादी सद्दाम तांबोळी (रा.बेगमपूर) यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या ७० हजारांची एक म्हैस व रेडी २३ जुलै रोजी ...

Two traders arrested for buying stolen buffalo | चोरीची म्हैस विकत घेतल्याप्रकरणी दोघा व्यापाऱ्यांना अटक

चोरीची म्हैस विकत घेतल्याप्रकरणी दोघा व्यापाऱ्यांना अटक

तामदर्डी शिवारातून फिर्यादी सद्दाम तांबोळी (रा.बेगमपूर) यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या ७० हजारांची एक म्हैस व रेडी २३ जुलै रोजी आरोपी कमाल वाघमारे व सचिन कोळी यांनी चोरून नेल्या होत्या. या दोघांनाही पोलिसांनी अटक करून चौकशी केली. त्याने मोहोळ येथील व्यापारी इब्राहिम कुरेशी याला विकल्याचे पोलिसांना सांगितले. त्यावरून पोलिसांनी व्यापाऱ्यास अटक करून एक म्हैस व रेडी जप्त केली. दुसऱ्या घटनेत सिध्दापूर येथील म्हैस वरील दोघा चोरट्यांनी चोरून नेली होती. ही म्हैस सिध्दापूर येथील व्यापारी संतोष भोसले याला विकली होती. पोलिसांनी आरोपीकडून मुद्देमाल हस्तगत करून संबंधित मालकाच्या ताब्यात दिल्याचे सांगण्यात आले.

हा तपास डीवायएसपी राजश्री पाटील व पाेलीस निरीक्षक जाेतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दयानंद हेंबाडे व त्यांचे सहकारी पोलीस सोमनाथ माने, सचिन दरदरे यांनी लावला.

---

ताक फुंकून पिण्याची व्यापाऱ्यांवर वेळ

दरम्यान तालुक्यातील आणखी काही ठिकाणच्या गाई, म्हशी चोरीला गेल्या आहेत. याबाबत पोलीस अधिक कसून तपास करीत आहेत. पोलिसांनी चक्क व्यापाऱ्यांनाच अटक केल्यामुळे चोरीचा माल विकत घेणाऱ्या व्यापाऱ्यांना ताक फुंकून पिण्याची वेळ आली आहे.

----

Web Title: Two traders arrested for buying stolen buffalo