शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर विद्यापीठात पेपर फेरतपासणीसाठी २ हजार ७४१ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 10:45 IST

सोलापूर विद्यापीठ : दोन महिने करावी लागते प्रतीक्षा

ठळक मुद्देसोलापूर विद्यापीठाच्या वतीने मार्च ते मे २0१८ दरम्यान सर्व विषयाच्या परीक्षा पंधरा दिवसात पेपर तपासून देण्याचा नियम असताना विद्यार्थ्यांना दोन-दोन महिने प्रतीक्षा करावी

सोलापूर : सोलापूर विद्यापीठांतर्गत घेण्यात आलेल्या विविध परीक्षांच्या पेपरची फेरतपासणी करण्यासाठी २ हजार ७४१ अर्ज परीक्षा विभागाला प्राप्त झाले आहेत. पंधरा दिवसात पेपर तपासून देण्याचा नियम असताना विद्यार्थ्यांना दोन-दोन महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. 

सोलापूर विद्यापीठाच्या वतीने मार्च ते मे २0१८ दरम्यान सर्व विषयाच्या परीक्षा घेण्यात आल्या आहेत. सत्र-१, सत्र-३, सत्र-५ आदी परीक्षांमध्ये अभियांत्रिकी, शास्त्र, वाणिज्य, कला, अध्यापक, फार्मसी अशा सर्व विषयाच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या.

परीक्षेच्या निकालानंतर अनुत्तीर्ण झालेल्या व कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना ७ दिवसात फोटो कॉपीसाठी अर्ज करावा लागतो. फोटो कॉपी मिळाल्यानंतर ७ दिवसांमध्ये पेपर फेरतपासणीसाठी विद्यापीठाकडे पाठवावा लागतो.फोटो कॉपीसाठी आॅनलाईन अर्ज करण्याची मुदत दि.२५ जुलै पर्यंत होती. आॅनलाईन अर्ज केल्यानंतर सिस्टीममध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने बहुतांश विद्यार्थ्यांना आॅनलाईन फोटो कॉपी प्राप्त झाल्या नाहीत. ज्यांना प्रति (कॉपी) मिळाल्या नाहीत त्यांना विद्यापीठ झेरॉक्स प्रती (मॅन्युअली प्रिंट) काढून देत आहेत. 

फोटो कॉपी मिळाल्यानंतर तो पेपर पुन्हा फेरतपासणीसाठी पाठवावा लागतो. हा प्रकार एकीकडे सुरू असताना दुसरीकडे फेरतपासणीला अनेक अडचणी येत आहेत. फेरतपासणीसाठी विद्यापीठातील परीक्षा विभागाचे कर्मचारी स्वत: पेपर घेऊन प्राध्यापकांच्या महाविद्यालयात जात आहेत. पेपर तपासून घेत आहेत आणि निकाल जाहीर करीत आहेत. या प्रक्रियेत वेळ खूप जात असून याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना सोसावा लागत आहे. 

बºयाच विद्यार्थ्यांचे प्रवेश यामुळे निश्चित होत नाहीत. प्रवेश घ्यावा की नाही असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर पडत आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मात्र याचा मोठा फटका बसत आहे. सध्या बºयाच विद्यार्थ्यांना फेर तपासणीला गेलेल्या पेपरची प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. 

आॅनलाईन सिस्टीममध्ये तांत्रिक अडचणी आल्याने फोटो कॉपी देण्यास अडचणी येत आहेत. विद्यार्थांचा त्रास कमी करण्यासाठी लवकरात लवकर पेपर तपासण्यासाठी परीक्षा विभाग प्रयत्न करीत आहे. लवकरच फेर तपासणी पूर्ण केली जाईल. डॉ. धवल कुलकर्णी, संचालक, परीक्षा मंडळ, सोलापूर विद्यापीठ. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूरexamपरीक्षाStudentविद्यार्थी